पॅथर नेते बुध्दवासी शिवाजी कदम यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन

तुळजापूर, दि.५(क.वृ.): येथील भिमनगरचे माजी नगरसेवक, युवा पॅथर बुध्दवाशी, शिवाजी देवाप्पा कदम यांच्या स्मृणार्थ सार्वजनिक वाचनलयाचे रिपाईचे मराठवाडा नेते आनंद पांडागळे तसेच बीआरएसपीचे नेते अरुण आप्पा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी रिपाई जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, शहराध्यक्ष अरूण कदम,रोजगार आघाडीचे आप्पा कदम, युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस शुभम कदम, किरण कदम, संजय कदम, शंभू कदम, प्रितम सोनवणे, सोनू कदम, गोकूळ कदम, विनोद भालेकर, सुशिल कदम यांची उपस्थीती होती.
याप्रसंगी बोलताना मराठवाडा उपाध्यक्ष पांडगळे म्हणाले युवा नेते पॅथर बुध्दवासी शिवा कदम हे लढाव्या नेता होता त्याच्या अकाली जाण्याने रिपब्लिकन पक्षासह बौध्द समाजाची कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली ज्या लढाव्या वृत्तीने पॅथर शिवा कदम जगले त्याबध्दतीने समाजाती युवकांनी आपले जिवन जगावे, निर्व्यसनी राहुन शरीर, अरोग्य सांभाळले पाहिजे, या वाचनालयाच्या निमित्ताने प्रत्येकाने वाचनाकडे वळावे, बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला या मुलमंत्राचे आत्मसात करून शैक्षणिक, सामाजीक, राजकिय आर्थिक चळवळीत काम करावे.
आज खऱ्या अर्थाने समाजातील युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. असे म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन सागर कदम राजपाल शिवा कदम यांनी केले.
0 Comments