Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरभावी येथे शेतकर्‍यांना कृषीदूतांकडून बोर्डो पेस्ट विषयी मार्गदर्शन

शिरभावी येथे शेतकर्‍यांना कृषीदूतांकडून बोर्डो पेस्ट विषयी मार्गदर्शन 

सांगोला दि.२१(क.वृ.): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत जळगाव येथील डाॅ. उल्हास पाटील कृृषी महाविद्यालयातील कृषीदुत दिलीप बबन रणदिवे यांनी कृृषी जागरुकता व औद्योगीक कार्यानूभव कार्यक्रमाद्वारे शिरभावी(ता.सांगोला) येथे शेतकर्‍यांना फळबागेमध्ये बोर्डो पेस्टचा वापर या विषयी मार्गदर्शन केले बहुवार्षीक असणार्‍या फळझाडांचा विविध प्रकारच्या रोगांपासुन व किडिंपासुन बचाव करण्यासाठी व त्यातुन अधिक उत्पन्न काढण्यासाठी मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोग व इतर किटकांच्या नियंञनासाठी बोर्डो पेस्ट कसे बनवता येईल, त्याचे फायदेव परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच मृदा परिक्षण, बीज प्रक्रिया, बुरशी व अळी नियंञण, पशुखाद्य प्रक्रिया, दुधापासुन वेगवेगळे पदार्थ बनविणे आणि आधुणीक शेतीसाठी मोबाईल ॲप व त्याचा वापर कसा करावा, तण नियंत्रनाच्या पद्यती, पिकांसाठी खतांचा योग्य वापर  याची माहिती दिली यावेळी गाव परिसरातील शेतक उपस्थित होते.

कृषी अभ्यास दौरा पुर्ण करण्यासाठी दिलीप बबन रणदिवे यांना कृृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस एम पाटील, उपप्राचार्य प्रा.पी सी देवरे, कार्यक्रम समन्वयक प्रा.ए डी फाफळे, कार्यक्रम अधिकारी प्रा.बी बी मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments