प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यशोदा लोखंडे या महिलेला आपला जीव गमवावा लागला - खिलारे

अकलूज दि.२१(क.वृ.): प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अकलूज येथील एका महिलेला जीव गमवावा लागला असून संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व रॅपिड टेस्ट बंद करण्यात यावेत अशी मागणी अकलूज युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन प्रांताधिकारी, तहसिलदार यांचेकडे सादर केले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, Covid-19 या रॅपिड टेस्ट सर्वत्र चालू आहेत. या रॅपिड टेस्ट संशयास्पद असून बंद करण्यात याव्यात म्हणून युवासेना अकलूज शहराच्या वतीने १०/८/२०२० रोजी उपविभागीय दंडाधिकारी अकलूज यांना निवेदन देण्यात आले होते.परंतु युवासेनेच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. निवेदनाची दखल वेळीच घेतली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता.
सदर घटना दि ०५/०९ /२०२० रोजी प्रशासनाच्यावतीने क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी covid-19 च्या रॅपिड टेस्ट चालू होत्या.शासनाच्या असणाऱ्या आशा वर्कर यांनी लोखंडे कुटुंबातील यशोदा लोखंडे यांना घरून रॅपिड टेस्ट करण्यासाठी नेहले होते.त्या महिला रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटिव निघाल्या म्हणून त्यांना व सर्व कुटुंबियांना कॉरनटाईन करण्यात आले होते.आपला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आलाय या भीतीने त्यांची प्रकृती खालवली होती.अकलूज शहरात वेंटीलेटर शिल्लक नसल्याने त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला रेफरन्स केले.त्या ठिकाणी भीतीने त्यांचा मृत्यू झाला.सदर महिला त्याठिकाणी निगेटिव आल्या.त्यानंतर त्यांची डेड बॉडी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.काहीच कारण नसताना लोखंडे कुटुंबीयांना हा मानसिक त्रास झाला व यशोदा लोखंडे यांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासनाने युवासेनेच्या मागणीचा त्यावेळी विचार करून रॅपिड टेस्ट बंद केल्या असत्या तर कदाचित ही घटना घडली नसती. सदर घटनेशी संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन घेण्यात यावा व रॅपिड टेस्ट बंद करण्यात याव्या. या मागणीसाठी दि.१०/०९/२०२० रोजी महर्षी कॉलनी येथील सर्व नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले असल्याची माहिती शेखर राजाभाऊ खिलारे युवासेना शहरप्रमुख अकलूज यांनी दिली.
0 Comments