Hot Posts

6/recent/ticker-posts

तिर्थक्षेञ तुळजापूरात २३ ते ३० सप्टेंबर जनता कर्फ्यू - नगराध्यक्ष रोचकरी

तिर्थक्षेञ तुळजापूरात २३ ते ३० सप्टेंबर जनता कर्फ्यू - नगराध्यक्ष रोचकरी


तुळजापूरच्या जनतेने जनता कर्फ्यु यशस्वी करुन कोरोना संकट रोखावे - रोडगे
जनतेने पुकारलेल्या जनता कर्फ्यु स प्रशाषण सहकार्य करेल - डी.वाय.एस.पी टिपरसे

तुळजापूर दि.२१(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना बाधीत रुग्णांचा वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर व शारदीयनवराञोत्सव पुर्वी कोरोना रुग्णाचा आटोक्यात  येण्यासाठी शहरात बुधवारा दि.२३ सप्टेंबर ते दि.३० सप्टेबर २०२० या कालावधीत जनता कर्फ्यु (लॉकडाऊन) लागू करणार असल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या  शनिवार दि.१९ रोजी नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली  नगरसेवकमध्ये चर्चा होवुन यात जनता कर्फ्यू करण्याचा  निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर रविवार दि.२० रोजी प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे तहसिलदार सौदागर तांदळे उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. चंचला बोडके सह सर्व  नगरसेवक यांच्यात बैठक होवुन जनता कर्फ्यू लॉकडाऊन करण्याचा निर्णयावर शिकामोर्तब झाला यावेळी सर्वच विभागाचे प्रशासकीय अधिकारी वर्गाने जनतेने पुकारलेल्या जनता कर्फ्यूस प्रशाषण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे म्हणाले "तुळजापूर शहरातील जनतेने पुकारलेला जनता कर्फ्यू कडकडीत पाळुन तो यशस्वी केला तर निश्चितपणे कोरोना रोखला जाईल व तिर्थक्षेञ तुळजापूर वर आलेले कोरोना संकट दूर होईल." याकामी प्रशाषण आपल्याला सहकार्य करेल असे यावेळी म्हणाले.

जनता कर्फ्युत काय चालु व बंद असणार ते पुढीलप्रमाणे :
यात दवाखाने व दवाखान्याच्या शेजारचे मेडिकल , दुध वितरण सकाळी ७ ते ९ चालू राहील. 
सर्व दुकाने, कार्यालय, मार्केट, पेट्रोल पंप, इत्यादी सर्व प्रकारच्या आस्थापने बंद राहील.
दंड :-
त्याचप्रमाणे दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणाऱ्यास दोन हजाररुपये दंड, विना मास्क लावता फिरणाऱ्यास एक हजार रुपये दंड
Reactions

Post a Comment

0 Comments