अशोक कामटे संघटनेचे संतोष महिमकर उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित

सांगोला दि.४(क.वृ.): सांगोला शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष महिमकर यांची निवड करण्यात आली होती मागील 2019-2020 वर्षभरात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांचे कार्य केले त्याचबरोबर गेल्या वर्षभरात संघटनेच्या माध्यमातून सर्वच विभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे संघटनेस गतवर्षी जानेवारी 2020 या महिन्यात आदर्श संघटना तालुका स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे संतोष महिमकर हे अत्यंत कष्टाळू व मनमिळावू व्यक्तिमत्व असल्याने संघटना हे यश प्राप्त करू शकल्याची माहिती संघटनेचे संस्थापक निळकंठ शिंदे सर यांनी दिली याची दखल घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ अध्यक्ष संतोष महिमकर यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले सदर सत्कार य मंगेवाडी चे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सत्कार मूर्ती संतोष महिमकर यांनी यापुढील काळात देखील संघटनेसाठी तन, मन, धनाने कार्य करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष चैतन्य राऊत, उपाध्यक्ष संदेश पलसे, सचिव मयुरेश गुरव ,निमंत्रीत सदस्य निलेश नष्टे ऍड .हर्षवर्धन चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांनी संतोष महिमकर यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या यावेळी संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अच्युत फुले यांनी मानले.
0 Comments