5% दिव्यांग राखीव निधी वाटप न करणार्या ग्रामविकास अधिकारी व संबंधित ग्रामपंचायत यावर कार्यवाही करण्याची कळंब प्रहार संघटनेची मागणी अन्यथा “भिक मांगो आंदोलन” करणार

कळंब दि.४(क.वृ.):- दिव्यांगांना प्रत्येक ग्रामपंचायतीने 5% दिव्यांग राखीव निधी वाटप करावा अशी कायद्यात तरतूद असून याबाबत विविध शासन निर्णय असताना सुद्धा कळंब तालुक्यातील ग्रामपंचायती व ग्राम विकास अधिकारी कायद्याला व शासन निर्णयाला केराच्या टोपलीत टाकून दिव्यांगांना 5% दिव्यांग राखीव निधी पासून वंचित ठेवत आहेत. यासंबधीतचे निवेदन कळंब प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात व तहसीलदार कळंब यांना देण्यात आले आहेग्राम विकास अधिकाऱ्यांना याबाबत अर्ज देऊनही वरिष्ठांच्या पाठबळामूळे ते अर्जांना जुमानत नाहीत. शिवाय टोलवाटोलवी ची उत्तरे देण्यात येत आहेत. कारण बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामविकास अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून 5 % दिव्यांग राखीव निधीचा अपहार केल्याची किंवा निधी इतरत्र वळवल्याची शक्यता आहे. तरी 5% दिव्यांग राखीव निधी वाटप न करणार्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची व संबंधित ग्रामपंचायत बरखास्त करण्याची कार्यवाही कळंब प्रहार संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदन पंचायत समिती कार्यालयात व तहसीलदार कळंब यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 6 अन्वय गटविकास अधिकारी यांना दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त केलेले असल्याने सध्या कोरोना संसर्गामूळे दिव्यांग व्यक्ती हालाकीचे जीवन जगत असल्याने 5% दिव्यांग राखीव निधी दिव्यांगांच्या बँक खात्यात टाकावा. या कामी हलगर्जीपणात करणार्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करावी. दोषी ग्रामपंचायत बरखास्त करावी. अन्यथा कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला असून तालुक्यातील कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मारहाण, धमकी किंवा जिविताला धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आणि आपली राहिल याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. या निवेदनावर कळंब तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, राज हजारे, बालाजी बावणे, अनसाहेब वाघमारे, दिगंबर इंगळे, शेख तै मुरलकर अशोक सोमासे महेश करंजकर मंगल शिंदे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments