महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षपदी रामचंद्र इकारे

सोलापूर दि.२०(क.वृ.): महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या कार्याध्यक्षपदी रामचंद्र इकारे यांची निवड झाली आहे या संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले (अमरावती) व राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंके (धुळे) यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
कला शिक्षकांच्या अडचणी शासनस्तरावर सोडविण्यासाठी राज्यस्तरावर कार्यरत असणारी ही संघटना आजपर्यंत अनेक प्रश्न सोडविण्यामध्ये यशस्वी झाली असून ही संघटना लोकशाही पद्धतीने पाऊल ठेवत कला विषय व कलाशिक्षक सन्मानाने जगला पाहिजे प्रत्येक तळागाळातील शिक्षकांचे जटिल प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने ते सोडविणे त्यासाठी पाठपुरावा करणे ,कलाशिक्षक भरती यासाठी प्रयत्न करणारे मोठे व्यासपीठ आहे सोलापूर, सांगली सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यात संघटना बांधणी साठी दिलेल्या योगदानातून इकारे यांची निवड झाली आहे .कलाशिक्षक सोबतच लेखक,कवी म्हणून परिचित असलेल्या रामचंद्र इकारे यांनी आजपर्यंत विविध सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपले योगदान दिले आहे.
रामचंद्र इकारे यांच्या या निवडीबद्दल राज्य कार्यकरणीतील प्रल्हाद शिंदे (औरंगाबाद), किरण सरोदे (पुणे), राजेश निंबेकर(पुणे), मिलिंद शेलार(पुणे), रमेश तुंगार(नाशिक), विवेक महाजन(औरंगाबाद), नवाब शाह (अहमदनगर), हुसेन खान(पुणे), सुनील महाले(धुळे) यांच्यासह विभागीय अध्यक्ष सुनील शिखरे(सातारा), विभागीय उपाध्यक्ष सुहास पाटील(सांगली), जिल्हा कार्यकारिणी संजय पवार, सावता घाडगे, अमित वाडेकर, नाथा लोंढे, शिवभूषण ढोबळे,विशाल सरतापे, संतोष उपरे, सुहास गायकवाड, संतोष कदम, संदीप शाह, नितीन मिरजकर, शोभा बिरादार, रजनी चौरे यांचेसह प्राचार्य आण्णासाहेब पाटकूलकर कलाशिक्षक हरिदास कुंभार, दीपक माने आदींनी अभिनंदन केले.
0 Comments