Hot Posts

6/recent/ticker-posts

बायपास रस्ता काम ठेकेदाराचा मनमनी मुळे शेतकरी ग्रामस्थांचा मुळावर!

बायपास रस्ता काम ठेकेदाराचा मनमनी मुळे शेतकरी ग्रामस्थांचा मुळावर!



मोठ्यांची सोय छोट्यांची गैरसोय!

तुळजापूर दि.२०(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील तडवळा गावा पासुन उस्मानाबाद रस्त्याकडे जाणाऱ्या बायपास मार्ग रस्ता काम करताना ठेकेदाराने नियोजन शुन्य केलेल्या कामाचा फटका शेतकरी ग्रामस्थ व वाहतुक दारांना बसला आहे. या कामाची पहिल्याच झालेल्या मोठ्या पावसात पोलखोल झाल्याने या कामाची गुण नियञक पथका कडून  गुणवत्ता चौकशी करुन दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ञस्त शेतकरी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वाहनांची गर्दी होवुन  कोंडी होवु नये म्हणून  सोलापूर नळदुर्ग  लातूरहुन येणारे वाहने तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दी करु नये थेट उस्मानाबाद ला जाण्यासाठी उस्मानाबाद  बायपास रस्ता तयार केला .या अंतर्गत  लातूर हुन  तुळजापूर कडे येणाऱ्या रस्त्यावर काक्रंबा गावाजवळुन तडवळा मार्ग  उस्मानाबाद बायपास कडे जाण्यासाठी बायपास  रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

माञ हे काम करताना त्या रस्त्यावर असणाऱ्या गावातील ग्रामस्यांचा सोयी गैरसोयीचा विचार केला गेला नाही. ठेकेदाराने ठराविक लोकांना  हाताशी धरुन दलालांचा माध्यमातून दडपशाही करुन काम उरकण्याचा प्रयत्न केला याचा परिणाम सर्हीस रस्ता न केल्याने व पाणी वाहुनृ जाण्यास कुठलाही मार्ग न केल्याने हे थांबलेले पाणी शेतात गावातील शेतकऱ्यांच्या घरात गोठ्यात घुसले .या वेळी कुण्या ग्रामस्थांनी तक्रार करताच दलालांन मार्फत त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न झाला पर्यायाने ठेकेदाराने मनमानी पध्दतीने काम केले. यात पावसाचे पाणी काढुन देण्याचा नियोजना कडे दुर्लक्ष केल्याने नुकताच झालेल्या पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी कुठलीही उपाययोजना न केल्याने आज पावसाचे पाणी आडुन ते  शेतात तसेच  झोपडपट्टी घुसले काही  रस्त्यावर थांबल्यानै शेतकरी गोरगरीब व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक यांना गोरसोयीस सामोरे जावे लागले यात शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या उभे पिके हातुन गेल्यानै या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करुन शेतकरी ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी ग्रामस्थांन मधुन  केली जात असुन नाही दिले तर शेतकरी ग्रामस्थ आंदोलन करण्याचा पाविञ्यात आहे.

बायपास रस्ता कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन त्याचे मोठे नुकसान झाले असताना प्रशाषणाने ही या मंडळी ना वा-यावर सोडल्यानै लोकप्रतिनाधी तरी आमच्या वर आलेल्या संकटाची दखल घेण्याची मागणी ञस्त शेतकरी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments