Hot Posts

6/recent/ticker-posts

तिर्थक्षेञी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची चर्चा व हालचाली

तिर्थक्षेञी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची चर्चा व हालचाली

तुळजापूर दि.२०(क.वृ.)- तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना बाधीत रुग्णांचा वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर व शारदीयनवराञोत्सव पुर्वी कोरोना रुग्णाचा संखेत घट होण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्याचा हालचाली सुरु असुन 22 सप्टेंबर ते 29  सप्टेबर 2020 या  कालावधीत लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात सप्टेंबर महिन्याच्या प्रथम दिना पासुन कोरोना प्रार्दुभाव वाढू लागला असुन तो कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.

या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांन साठी खुले करण्यास प्रमुख अडथळा ठरत असल्याचे पार्श्वभूमीवर शहर वासियांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते याला कारण गेली सहा महिन्या पासुन मंदिर भाविकांन साठी बंद असल्याने शहर वासियांची अर्थिक नाडीआवळली गेली होती.

त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ऐकदा  लाँकडाऊन ची चर्चा मागणी होवू लागली अखेर या बाबतीत शनिवार दि.19 रोजी नगरसेवक मध्ये प्राथमिक चर्चा होवुन यात लाँकडाऊन करण्याचा विचार चर्चिला गेला रविवारी दि.२० रोजी अधिकारी व लोकप्रतिनीधीची बैठक होणार असुन यात या बाबतीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन बाबतीत मतमतांतर !
लॉकडाऊनची चर्चा होवु लागताच या बाबतीत अनेक मतमतांतर पुढे येत असुन यात यापुर्वीचा लॉकडाऊनने काय साध्य झाले, गोरगरीबांनी काय खावे. नवराञोत्सव पुर्वी कोरोना रोखण्यासाठी लाँकडाऊन गरजेचे लॉकडाऊन कडकडीत करावे  यासह  अनेक मत मत्तांतर सध्या सोशल मिडीया वरुन  चर्चा तुन व्यक्त होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments