सांगोला येथील असंख्य व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवून दिले तहसीलदार यांना सह्याचे निवेदन

सोलापूर दि.१५(जगन्नाथ साठे)(क.वृ.): मंगळवारपासून सांगोला तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यूची घोषणा लोकप्रतिनिधीने केली आहे, जर बंद पाळला तर त्यानंतर शहरात गर्दी वाढून सोशल डिस्टन्सचा प्रश्न उद्भवणार असून त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतील, यासाठी सांगोला शहरातील असंख्य व्यापारी, आपले व्यवसाय चालू ठेवण्याच्या तयारीत आहे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे याबाबत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
सांगोला शहरातील असंख्य व्यापारी, व्यापारी पेठ चालू ठेवणारे समर्थक,छोटे मोठे धंदेवाले यांनी आज सांगोला तहसीलदार यांना ऑनलाईन निवेदन पाठविले असून यामध्ये त्यांनी या बंदला विरोध दर्शविला आहे.या निवेदनात त्यांनी सांगोला शहरातील काही व्यापाऱ्यांना पॉझिटिव आकड्यांची भीती वाटते त्यांनी उत्स्फूर्त बंद पाळावा, गरजे शिवाय घराबाहेर पडू नका, त्यांनी शेकडो पाठिंबा दर्शक सह्या गोळा केल्या आहेत ,सांगोला शहरात सुमारे 2200 उद्योजक, छोटे-मोठे व्यापारी धंदेवाले, आहेत, संपूर्ण तालुक्यातील संख्येचे उपलब्धता नसल्याने आपण कल्पना करू शकतो.ज्यांचे हातावर पोट आहे जे स्वतःच्या मुलाबाळांसाठी कष्ट करतात, त्यांनी व्यवसाय चालू ठेवावेत,असे ही निवेनात म्हटले आहे.
व्यवसायाच्या जागेचे भाडे,लाईट बिल,कामगारांचे पगार, मुलांचा शैक्षणिक खर्च कुटुंबाचे आजार, राहणीमान, यांचा खर्च न थांबणारा आहे,म्हणून धंदेवाल्यांनी आपल्या नुकसान फायद्याचा निर्णय स्वतः घ्यावा. उपलब्ध माहितीनुसार लोक डॉन करणे विशेष अधिकार सध्या फक्त प्रधानमंत्री यांना आहेत.
त्यामुळे सर्व स्तरावरील प्रशासन, पोलीस यांचा बंद, जनता कर्फ्यूचा संबंध असणार नाही याची नोंद घेऊन यापूर्वी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करीत आपले व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवून आपले नुकसान करणार नाहीत,म्हणून सांगोला शहरातील असंख्य व्यापारी, पेठ चालू ठेवणारे समर्थक, धंदेवाले यांनी या जनता कर्फ्यू ला पाठिंबा दर्शवणारे नसल्याचे सांगितले आहे.
सहा सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीत व्यासपीठावर एक विद्यमान आमदार व दोन माजी आमदार तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष व तीन माजी नगराध्यक्ष यांच्यासमोर असंख्य व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला. समारोपाच्या भाषणात या नेते मंडळीनी व माजी नगराध्यक्ष प्रा.पी.सी.झपके सर यांनी सर्व व्यापारी व जनता यांना विश्वासात घेतल्याशिवाय बंदची घोषणा केली जाणार नसल्याची हमी दिली होती, त्यानंतर दोन दिवसानंतर शिवाजी चौकात झालेल्या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी या बंद ला विरोध केला.
0 Comments