मोहोळ - पंढरपुर पालखी महामार्ग कृती समिती मोहोळ यांच्या वतीने खासदार डाॅ. जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले

मोहोळ दि.२(क.वृ.): मोहोळ नगरपरिषद हद्दी मधील रोड लगत शेतकरी, एन.ए. प्लॉट धारक व भाड्यापट्टेने करारने दिलेले अधिकृत हॉटेल, बँक, हॉस्पिटल उद्योजकांना प्रांथ कार्यालयांनी पूर्व कल्पना न देता जमिनीची विद्रूपीकरण केले तसेच रोड च्या कडेचे झाडे तोडणे सुरू आहे.
यावेळी खासदार साहेब यांच्याशी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. व लगेच प्रांथ अधिकारी सचिन ढोले यांच्या बरोबर दूरध्वनी वरुण बोलणे झाले. या दोन तीन दिवसात बाधित लोकांबरोबर माझ्या ऑफिस हॉल मध्ये बैठक घेऊ असे सांगितले व बाजार भाव समृद्धी महामार्ग प्रमाणे मोबदला मिळेल असे प्रयत्न करु असे म्हणले व संपादित झालेले लोकांना सारखे पंढरपूर ला जाणे म्हणजे वेळ पैसा खर्च होण्यापेक्षा त्या करिता मोहोळ तहसील कार्यालय मध्ये एका क्लर्कची नेमणूक करावी अशीही मागणी केली. या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर खास बाब म्हणुन चर्चा करतो व योग्य तो मार्ग काढु असे आश्वासन दिले. यावेळी कृती समिती अध्यक्ष आनंत नागणकेरी, डाॅ सुधीर जोशी ,शिवशंकर लोखंडे, अँड. मळशिध्द मदने, पृथ्वीराज देशमुख ,सुरेश कांबळे, चंद्रकांत माने, चंद्रराज काळे, भारत ढोले, पिटू शिंदे, राजाभाऊ वाघमारे, संपत मोहोळकर, चेतन पाटील, पांडु काळे ,विजय गरड ,दाजी काकडे व शेतकरी, व्यापारी ,जागा मालक उपस्थितीत होते.
0 Comments