Hot Posts

6/recent/ticker-posts

आय. आर. बीने शेतीच्या पाण्यास वाट काढुन न दिल्याने शेतात पाणी थांबुन शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान !

आय. आर. बीने शेतीच्या पाण्यास वाट काढुन न दिल्याने शेतात पाणी थांबुन शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान !

      

तुळजापूर दि.१९(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात शुक्रवार झालेल्या तुफान पावसामुळे तुळजापूर सोलापूर महामार्गावरील पुर्व बाजूच्या शेतीच्या  पाण्यास वाहुन जाण्यासाठी  आय आर बी ने वाट करुन न दिल्याने  हायवे लागत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबुन शेकडो ऐकर शेतातील पिके पाण्यात वाहुन गेल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

शेतात पाणी थांबल्याने काढणीस आलेले सोयाबीन लावलेला कांदा, झेंडू याचे मोठे नुकसान झाले तर पेट्रोल पंप ही पाण्यात गेला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान आय आर बीने भरुन देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गातुन केले जात आहे.

या बाबतीत अधिक माहीतीअशीकी तुळजापूर ते सोलापूर महामार्ग रस्ता आय आर बी ने केला आहे . सध्या या रस्त्यावर भरमसाठ टोलवसुली मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पुर्वीच्या या जुन्या रस्त्यावर शेतात पाणी थांबु नये म्हणून पिचींग चा नाल्या होत्या व पावसाचे पाणी सहजगत्या वाहुन खाली जात होते माञ त्यानंतर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आय आर बी ने केला हे करताना हायवेचा पुर्व बाजुस  तुळजापूर घाटशिळ पायथ्था ते सिंदफळ झोपडपट्टी ब्रीज च्या  पुर्व बाजूच्या  शेतातील पाणी काढुन देण्यास पाण्यास वाट करुन दिली नाही त्यामुळे शुक्रवार झालेल्या मुसळधार पावसाचा पाण्यास वाट न मिळाल्याने पार डोंगरावरुन  सदरील पाणी शेतात थांबले यामुळे शेतकऱ्यांचे पिके तर वाहुन गेले जमिनी ही वाहुन गेल्या विहीरी पाण्याने तुंडब भरुन गेल्या पाणी ओघ ऐवडा प्रचंड होता कि सदरील पाणी दीड फुट सर्वीस रोड वरुन वाहत उतारा कडे गेले या रस्त्यावर असणाऱ्या शुभम  पेट्रोल पंपात ही पाणी शिरले.

शेतातील पाणी वाहुन जाण्यास उपाययोजना न केल्याने नुकसान -
  • हायवे वाल्यांनी रस्त्यावर येणारे पाणी काढण्या पुर्ती स्वताची सोय केली माञ शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी काढण्यासाठी कुठलीही उपाययोजना न केल्याने आधीच कोरोना मुळे अर्थिक संकटात अडकलेला शेतकऱ्यांच्या हातातोंडीशी आलेला घास ही आय आर बी वाल्यानै हिरावून नेला
  • सदरील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान चे पंचनामे शाषणाने करुन त्यांना अर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे
Reactions

Post a Comment

0 Comments