मुसळधार पावसामुळे बारुळ येथील बोरी नदीवरील पूल पाण्याखाली

तुळजापूर दि.१९(क.वृ.):- मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे, अनेक तळे भरून वाहत आहेत, तुळजापूर तालुक्यातील मौजे बारुळ येथील बोरी नदीवरचा पूल दिनांक 18//09/2020 रोजी झालेल्या पावसाने पाण्याखाली गेला, त्यामुळे तुळजापूर नळदुर्ग या रोडवर वरून लातूर ला जाण्याचा मधला मार्ग बंद झाला आहे, त्याच बरोबर बारुळ, जवळगा (मेसाई), वडगाव (देव), वानेगाव आदी गावचा तालुक्याशी असणारा संपर्क सकाळी आज सकाळ पासून बंद होता, या पुलाची उंची वाढवावी म्हणून मागील 10 वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत आहेत, पण आज पर्यंत यावर फक्त कागदी घोडे नाचवली जात आहेत, प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक उमेदवार या बाबत फक्त आश्वासन देत असतो, परंतु आज पर्यंत यावर कसलीच कार्यवाही झाली नाही, पूल बंद असल्याने, मुलांचा शाळा, तालुक्यात जाऊन रोजगार करणारे, मजूर, दूध उत्पादक, शेतकरी, शेतमजूर आदींच्या आर्थिक जीवनावर त्याचा परिणाम होतो, त्याच बरोबर यातून एकादी दुर्दैवी घटना पण घडू शकते, तरी या पुलाची उंची लवकरात लवकर वाढवून याचे काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
0 Comments