Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रभारीसह सहकाराची जबाबदारी हजारेंकडे

राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रभारीसह सहकाराची जबाबदारी हजारेंकडे

सोलापूर दि.१९(क.वृ.):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सहकार विभागाचे उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी पदी राजेंद्र हजारे यांची निवड करण्यात आली. ही निवडी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडून मुंबई येथे करण्यात आली.

जनकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारे यांचे बचत गट व व्यावसायिकांना आर्थिक सहकार्य करण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक वर्ष सहकाराच्या माध्यमातून हजारे यांचे काम सुरू असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकार विभागाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आले आहे. तसेच हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढविण्‍यासाठी अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून चांगले प्रयत्न करण्यात आल्याने पश्‍चिम महाराष्ट्र प्रभारी याही पदाची जबाबदारी देण्यात आलेले आहे. ही जबाबदारी जयवंतराव पाटील यांच्याकडून देत असताना माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शिवाजीराव गर्जे, उमेश पाटील, लतीप तांबोळी, आदी उपस्थित होते. ही निवड केल्यानंतर हजारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचा सत्कार केला.


Reactions

Post a Comment

0 Comments