शमनजी कृषी महाविद्यालयाची फळबाग लागवडची प्रात्यक्षिके

लऊळ दि.१५(क.वृ.): लऊळ ता.माढा येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या प्राजक्ता हरिदास लंगोटे या कृषीकन्ये कडून ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत येथे आंबा फळबाग लागवडीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये आंबा फळ बागेसाठी खड्डा कसा करावा, कोण कोणते भर द्यावेत याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
याबरोबरच गांडूळ खताची गरज फॉस्फेट व शेणखत यांचे प्रमाण याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना बँक लोन प्रस्ताव व लोन विषयी जागृकता याची ची माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.बिराजदार,समन्वय प्रा. एम.डी.माळी,कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.बी कडपे विषय शिक्षक प्रा.टी.एस.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी डॉ.ज्ञानेश्वर लंगोटे,शंकर नकाते यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments