Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज गाव चालू राहील - सोमनाथ भोसले

अकलूज गाव चालू राहील - सोमनाथ भोसले


अकलूज दि.१०(क.वृ.): दि. ११ ते १८ सप्टेंबरचा जो बंद आहे तो शासकीय बंद नाही आणि बंद ठेवायचं का नाही तो आपला लोकनिर्णय आहे.सर्वांना विचारात न घेता फक्त व्यापारी असोशियनच्या लोकांना सर्व गाव समजून घेतलेला निर्णय आहे.असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना भोसले म्हणाले की व्यापारी असोशियन हे त्यांच्या व्यापारापूर्ते मर्यादित आहेत.पूर्ण गावाचा निर्णय घेण्याचा त्यांना काय अधिकार आहे ?शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,दलित यांच्या स्वातंत्र्याच काय ? प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या मीटिंगला कोणत्याही प्रकारे सर्व सामान्य नागरिक,अकलूज ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,सामान्य व्यापारी उपस्थितीत नव्हते.मग हा जनतेचा निर्णय कसा होईल.तरी आपले धंदे चालूच ठेवायचे असेल तर बिंदास चालू ठेवा. इथले स्थानिक प्रशासन आपल घर चालवत नाही.कोण विचारायला आले तर आमचा हाच निर्णय आहे असं ठाम सांगा तुम्हाला जबरदस्ती कोणी करणार नाही.! 
अकलूज शहर देि. ११ ते १८ तारखेपर्यंत बंदचा निर्णय शासनाचा नाही तो जनतेने घेयचा निर्णय आहे.पण स्थानिक प्रशासन हे गावातील मोजक्या १० लोकांना पूर्ण गाव समजत आहे.आणि त्यांना बरोबर घेऊन स्वतः च्या  निर्णयाची अंमलबजावणी करत आहे.जनतेचा निर्णय जनतेच्या परस्पर १० लोकांत घेऊन खरं तर जाणीवपूर्वक पिळवणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे.अधीच सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.लोकांचे धंदे सुरळीत चालत नाहीत.बचतगट,फायनान्स,घर भाडे,गाळे भाडे,लाईट बिल,हे हप्ते स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन केला म्हणून थांबणार नाहीत.ते जनतेला वेळोवेळी भरावेच लागणार आहेत.प्रशासन म्हणते जगायचं असेल तर लॉकडाऊन गरजेच आहे.पण कोरोना रोगावर फक्त लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे का ? 
इथल्या स्थानिक प्रशासनाला covid-19 परिस्थिती हाताळण्यास जमली नाही.पेशंटची संख्या हाताबाहेर गेली ती आटोक्यात आणण्यासाठी आता जनतेला पिळले जातेय. शासनाचा कोणताही निर्णय/आदेश नसताना स्थानिक प्रशासनाच्या चुका लपवण्यासाठी किंवा त्याच्यावरती पांघरूण घालण्यासाठी लॉकडाऊनवर भर दिला जातोय.तुम्हाला बंद ठेवायचं असेल तर आधी ज्यांची हातावरची पोट आहेत.त्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लावावा.असेही ते म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments