भाजपचा राष्ट्रीय विचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवू- धैर्यशील मोहिते-पाटील

अकलूज दि.१०(क.वृ.): सर्वांनी एकत्रीत काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे जनकल्याणाचे कार्य व भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय विचार समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करू असे मत भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
टेंभुर्णी येथे माढा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली.त्यावेळी संबोधित करताना भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील बोलत होते.
यावेळी खासदार रणजितसिंहनाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, संघटक रवी अनस्पुरे, व माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे व इतर मान्यवर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments