शाळा सुरु करण्याबाबत लहुजी सेनेचीे निवेदनाद्वारे मागणी

तुळजापूर दि.१०(क.वृ.): राज्यातील बंद असलेल्या शाळा,विध्यालये व महाविध्यालये तात्काळ सुरु करा अन्यथा चालू शैक्षणिक वर्ष रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री यानां तहसिल कार्यालय मार्फत तुळजापूरचे नायब तहसीलदार शिंदे यांचेकडे (दि.१०)रोजी लिखीत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा,विध्यालये व महाविध्यालये अद्याप बंदच आहेत. अनलाँक तरतुदीनुसार हाँटेल्स,बिअर शाँपी,बिअर बार,देशी दारु,एसटी सेवा,रेल्वे सेवा,अनेक प्रकारची दुकाने,उध्योग बाजार,कारखाने सुरु आहेत.
त्याचबरोबर सर्व धर्मीय देवालये सुरु व्हावीत अशा स्वरुपाची मागणी काही स्वार्थी लोक करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरीकाना मुभा आहे. मात्र देशाचे भावी आधारस्तंभ घडविणारी शैक्षणिक व्यवस्था बंद का असावी.शाळा,विध्यालये व महाविध्यालये बंद ठेवणे योग्य नाही. एकही विध्यार्थी कोरोनाचा संक्रमीत होणार नाही. याची योग्य ती जबाबदारी / नियमावलीसह शिक्षण विभागावर सक्तीची करुन शाळा,विध्यालये तसेच महाविध्यालये तात्काळ सुरु करावीत अन्यथा सध्याचे शैक्षणिक वर्ष(रद्द) करावे. असे नमुद केले आहे. निवेदनावर तुळजापूर तालुकाध्यक्ष किसन भाऊ देडे,उपाध्यक्ष कुंडलिक भोवाळ,विजय कांबळे,लक्ष्मण गायकवाड, संजय गायकवाड, मारुती कांबळे,अमोल सगट यांच्या सह्या आहेत.
0 Comments