Hot Posts

6/recent/ticker-posts

जनता कर्फ्युला जनसेवा संघटनेचा विरोध - रणजीतसिंह देशमुख

जनता कर्फ्युला जनसेवा संघटनेचा विरोध - रणजीतसिंह देशमुख 


अकलूज दि.१०(क.वृ.): अकलुज येथे दि.११ सप्टेंबर ते १८ जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. सदर बंद हा अकलुज व परिसरातील जनतेला विश्वासात न घेता केलेला असुन सदर बंद करणेसाठी प्रशासनाने  कोणालाही बळजबरी करू नये व ज्या व्यापार्यांना  दुकाने चालु करायची आहे त्यांनी दुकाने चालु ठेवावीत त्यांना डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली जनसेवा संघटनेचे  पुर्णपणे सहकार्य राहील अशी माहीती  जनसेवा संघटनेचे प्रवक्ते रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.
केंद शासनाने व महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन न करणे बाबत स्पष्टपणे भुमीका मांडली असुन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनीही सोलापूर जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार नाही असे जाहीर केले आहे तरीसुद्धा अकलुज मध्ये जनता कर्फ्यु जाहीर केले आहे.
जनता कर्फ्यु लागु करताना त्या गावातील जनतेला व्यापारी, सामाजीक संघटना, विविध पक्षाचे लोकांची मिटींग घेऊन सर्वांचे सहमतीने निर्णय घेणे गरजेचे असताना अकलुज मधील व्यापारी व जनतेचा विरोध असताना कोणालाही विश्वासात न घेता हा जनता कर्फ्यु जनतेवर लादला असुन शासनाने कोणताही अधिकृत आदेश न काढता हा बेकायदेशीर जनता कर्फ्यु जनतेवर लादला आहे  जनसेवा संघटनेचा या निर्णयाला विरोध आहे तरी ज्या व्यापार्यांना दुकाने व व्यवसाय चालू ठेवायचे आहेत त्यांनी आपआपले  व्यवसाय  चालू ठेवावेत जनसेवा संघटना त्यांना सर्वपोतरी सहकार्य करील पोलीस प्रशासनानेही कोणालाही दुकाने बंद करणेसाठी बळजबरी करू नये  असे आवाहन रणजीतसिंह  देशमुख  यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी जनसेवा संघटनेचे राजाभाऊ गुळवे, दिपक सूत्रावे नागेश स्वामी, सरदार तांबोळी, मोहसीन बागवान, अली शेख,सजय गाडे,निलेश लोहार,सुधीर रास्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments