ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजच्या माध्यमातून सायकलपटूनी केला १०० तासांचा फिटनेस प्रवास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजच्या माध्यमातून सायकलपटूनी केला १०० तासांचा फिटनेस प्रवास

 ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजच्या माध्यमातून सायकलपटूनी केला १०० तासांचा फिटनेस प्रवास 


अभियंता दिनानिमित्त सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूरचा उपक्रम

सोलापूर दि.२९(क.वृ.): सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर व कंसाइज इंजिनिरिंग सोल्युशन प्रा. लि. पिंपरी-चिंचवड तर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून  ऑनलाइन फिटनेस राईड चे आयोजन १५ सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.

सदर संकल्पनेमध्ये दिलेल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर पण कमी वेळेत सायकलिंग करणाऱ्या महिला श्रेणीत, पुरुष श्रेणीत व अभियंता श्रेणीत पहिल्या तीन सायकलपटूना बक्षीस म्हणून ट्रॉफी देण्यात आल्या. तसेच सहभागी सर्व सायकलपटूना ई-सर्टिफिकेट चे वितरण करण्यात आले.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नागरिक जवळपास तीन महिने लाॅकडाऊन मुळेघरी अडकून होते.  अन् लॉकडाऊन काळात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे सदर ऑनलाइन सायकलिंग राईड चे चॅलेंज देण्यात आले होती.

या उपक्रमात जवळपास १०० सायकलपटू यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. सदर उपक्रमास सोलापूर आणि इतर शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या राईड मध्ये १०० सायकलपटू तर्फे वैयक्तिक सायकलिंग केलेल्या राईडचा एकूण प्रवास हा सुमारे २०४२ किलोमीटर व १०० तासांचा एवढा होता.

२८ सप्टेंबर रोजी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सदर ऑनलाइन राईड मध्ये महिला श्रेणीतले पहिले तीन सायकलपटू : 
  1. जानव्ही गाढे, ५७.७ किमी, ३ तास २ मिनिटे
  2. श्रद्धा सक्करगी, ५२.५ किमी, ३ तास ८ मिनिटे
  3. मित्तल पटेल, २६.४४ किमी, १ तास ४५ मिनिटे
पुरुष श्रेणीत:
  1. राजेंद्र डांगे, २११.२३ किमी, ९ तास, १७ मिनिटे
  2. अवधुत जगताप, १८९.८३ किमी, ९ तास, ९ मिनिटे
  3. नितीन खंडागळे, १४१.३९ किमी, ७ तास, २८ मिनिटे
अभियंता श्रेणीत:
  1. स्वप्नील आळंद, ७१.१ किमी, ३ तास, २९ मिनिटे
  2. निखिल मालावडे, ४१.८ किमी, २ तास, ३० मिनिटे
  3. संतोष कुलकर्णी, ३६.५६ किमी, १ तास, ५२ मिनिटे
या विजेत्यांना कंसाइज इंजिनिअरिंग सोल्युशन प्रा. लि. पिंपरी चिंचवड 

तर्फे बक्षीस देण्यात आले, यावेळी कंपनी चे व्यवस्थापक मा. मनोजकुमार गायकवाड हे ऑनलाइन सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

सदर कार्यक्रम हा स्मार्ट सिटी च्या ऑफिस मध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला, यावेळी मा. त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मा. डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड महाविद्यालय, प्रा. नरेंद्र काटिकर, मा. विश्वनाथ गायकवाड, भारतीय व्यापार नौदल अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सोलापूर मध्ये सायकलिंग ची मोठी चळवळ उभी राहण्यासाठी सायकलिस्ट फाऊंडेशन चे प्रयत्न हे अतिशय उत्तम आहेत आणि सायकलिंग मुळे होणारे फायदे ऑनलाईन सहभागी झालेल्या लोकांना आवर्जून सांगितले.

प्रा. शंकर नवले, प्रा. मौलश्री गायकवाड आणि नौदल अधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांनी फिटनेस चा उपयोग समुद्रात जहाजेवर असताना कश्या पद्धतीने होतो आणि शारीरिक क्षमता असेल तर माणूस मानसिक दृष्ट्या देखील शक्षम राहू शकतो असे नमुद केले.

उपक्रमाचा वाढता प्रतिसाद आणि होणारी मागणी पाहता लवकरच ऑनलाइन फिटनेस चॅलेंजचा दुसरा टप्पा आखण्यात येईल, असे सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर चे अध्यक्ष प्रा.सारंग तारे यांनी सांगितले.

सदर उपक्रमामध्ये भाऊराव भोसले, शितल कोठारी, रजनीकांत जाधव, चेतन लिगाडे, अभिषेक दुलंगे यांचे सहकार्य लाभले.

येणाऱ्या काळात होणाऱ्या, दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन फिटनेस चॅलेंजच्या माहितीसाठी 9975924942, 9049659222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages