Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडीचे सौदागर कदम याची स्पर्धा परीक्षेतून माढा कोर्टात नियुक्ती

 विठ्ठलवाडीचे सौदागर कदम याची स्पर्धा परीक्षेतून माढा कोर्टात नियुक्ती

माढा दि.२९(क.वृ.):- महाराष्ट्र शासन व जिल्हा न्यायालयाच्या वतीने सन 2018 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून गुगवत्तेच्या जोरावर माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सुपुत्र सौदागर युवराज कदम याची माढा येथील कोर्टात लिपिक पदी नव्याने नियुक्ती झाली आहे.

विठ्ठलवाडी सारख्या छोट्या खेड्यातील गरीब कुटुंबातील मुलाने अथक परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादित केले आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण विठ्ठलवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय‌ व पदवीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले आहे.अत्यंत प्रतिकूल व घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण "कमवा व शिका" योजनेतून पूर्ण केले आहे.आई-वडील अल्पभूधारक असल्याने मोलमजुरी करून मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.त्याचे हे उल्लेखनीय यश इतरांसाठी निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.कोर्टात नियुक्ती मिळालेला हा विठ्ठलवाडीतील एकमेव नोकरदार आहे.

यशाबद्दल त्याचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, उपशाखापमुख मोहन कदम,सरपंच अरुण कदम, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, चेअरमन अनिलकुमार अनभुले, क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम,समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नागटिळक, उपशिक्षणाधिकारी नितेश कदम, डॉ.किशोर गव्हाणे,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल अनभुले, भागवत शेंडगे, बिभिषण गव्हाणे,माजी सरपंच बालाजी गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, पोलीस पाटील बालाजी शेगर, हनुमंत पाटील,डॉ.भिमराव माने, सतीश गुंड, हनुमंत कदम, सौदागर गव्हाणे, शिवाजी कदम, डॉ.संतोष कदम, डॉ.नेताजी कोकाटे, नेताजी उबाळे, राजाभाऊ कदम, किशोर गुंड, शंकर जाधव, दिनेश गुंड, धनाजी सस्ते, सज्जन मुळे, समाधान कोकाटे, अशोक जाधव, वैभव कदम, सौदागर खरात, भिवाजी जाधव, ब्रम्हदेव खैरे, अशोक कदम, गणेश दळवी यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईकांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments