जादा पैसे आकारणी करणाऱ्या रुग्णवाहिकेवर कारवाई करा : मोहसिन शेख

अकलूज दि.२८(क.वृ.):- शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हाॅस्पिटलचे हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकलूज नगरीत दिवसाढवळ्या रुग्णवाहिकेकडून कोरोनाच्या आडून रुग्णांची लयलूट सुरू असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुख सौ. शमा पवार यांना ईमेलद्वारे तक्रारी निवेदन दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी दिली. पुढे शेख म्हणाले की याची अकलूजहितीसाठी प्रत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पा
अकलूज शहरातील एका नामवंत हाॅस्पिटलच्या आवारातील रुग्णवाहिकेकडून प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी वेळात ज्यादा पैसे कमण्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दि.२७ सप्टेंबर रोजी एका नामवंत हाॅस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिकेच्या कर्मचारी यांनी जादा रक्कमेची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णवाहिकेवर प्रशासनाच्या वतीने फक्त कागदोपत्रीच अंकुश राहिले आहे की काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सध्या कोविडसारख्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणार्या संबंधित रुग्णवाहिका व कर्मचारी यांना लगाम घालण्याची अत्यंत गरज आहे. सामान्य जनतेचा दिवाळा काढणारा हा कोरोनाचा प्रादुर्भाव, आर्थिक बिकट परिस्थिती होणारी रुग्णांची लयलूट यामुळेच कदाचित मृत्युचे प्रमाण वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.असे मोहसिन शेख यांनी सांगितले.
0 Comments