मुख्याध्यापकानेच लुटले ज्ञानमंदिर!
सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात मुख्याध्यापकाकडून 11 लाख 98 हजारांचा घोटाळा!

पंढरपूर दि.२६(क.वृ.):- सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात मुख्याध्यापकाकडून 11 लाख 98 हजारांचा घोटाळा झाला असुन या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन सदर घोटाळ्याची रक्कम वसूल करून गुन्हा दाखल करा अशी मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे संजय नारायण अभंगराव यांनी केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात बी.एम.मुलाणी हे सहशिक्षक या पदावर कार्यरत असताना ते सातत्याने गैरवर्तन करीत असल्याचा आरोप करीत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. शाळेतील सहकर्मचार्यांशी गैरवर्तन करणे. पालकांशी उद्धट वर्तन करणे,व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे आदी कारणांमुळे सहशिक्षक मुलाणी यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.मात्र कोणताही आदेश नसताना कामावर घेण्यास भाग पाडून स्वतःच्या अधिकारात मुलाणी हे 26 जून 2017 रोजी शालेय कामी हजर झाले. मुलाणी यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून मी सेवाज्येष्ठ आहे मला मुख्याध्यपक करा,सहीचे अधिकार द्या म्हणून संस्था व्यवस्थापनावर दबाव आणला.सदर मुलाणी हे स्वतः हजर होण्यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून श्रीमती वैशाली चंदनशिवे या काम पहात होत्या. 26 जून पर्यंत श्रीमती चंदनशिवे या काम पहात असल्याची उपस्थिती पत्रकावर नोंद आहे.
प्रभारी मुख्याध्यपक श्रीमती चंदनशिवे यांच्या 25 जून 2017 पर्यंत सह्या असताना सहशिक्षक मुलाणी यांनी मागील पाने फाडून 1 ऑक्टोबर 2015 ते 25 जून 2017 अखेर हजेरीपत्रकावर दडपण आणून सह्या केल्या आहेत.शिक्षण विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना 1 ऑक्टोबर 2015 ते 25 जून 2017 या कालावधीतील वेतन 11 लाख 98 हजार रुपये अनाधिकाराने व वरिष्ठ अधिकार्यांना संगनमत करून काढले आहे.शासनाची फसवणूक केली आहे.
प्रकरणाची त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करावा व शाळेत हजर न राहता वेतन म्हणून अदा करण्यात आलेले 11 लाख 98 हजार रुपयाची रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे संजय नारायण अभंगराव यांनी केली आहे.
0 Comments