Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाशी दोन हात करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्ती समोर हतबल!

 कोरोनाशी दोन हात करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्ती समोर हतबल!


मदती शिवाय रबी पेरणी करणे अशक्य !

तुळजापूर दि.२६(क.वृ.):- तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसापासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता तोंडाला आलेले खरीप पीक हातुन गेले असुन कोरोनाशी दोन हात करणारा शेतकरी माञ पावासाचा नैसर्गिक आपत्तीमुळे हातबल बनल्याचे झाल्याचे दिसुन येत आहे.

मागील दहाते बारा  दिवासापासुन तुळजापूर तालुक्यात सतत उसंती न देता पाऊस बरसत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन पाण्यात गेल्याने यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन  शेंगामधून अंकुर बाहेर येत आहेत नुकताच लावण केलेला कांद्याचा पाण्यातच रेंदा होत आहे. जो जगला आहे त्यावर करपा रोग पडला आहे. मुग उडीदाचे ही मोठे नुकसान झाले आहे.

काढणीला आलेले नगदी पीक म्हणून शेतकरी ज्यांच्याकडे पाहतो त्या सोयाबीन व उडीद पिकाच्या उत्पन्नावरच बळीराजाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करीत असतो मात्र   पीक अस्मानी संकटामुळे धोक्यात आले आहे ज्यांचे उडीद व सोयाबीन काढुन टाकले आहे त्यांचे तर प्रचंड नुकसान झाले आहेच पण ज्यांचे पीक अजून शेतात उभे आहे त्या उभ्या पिकात प्रचंड पाणी थांबले असल्याने ते उभारलेल्या अवस्थेत उगवत असल्याने काढनीला आलेले पीक काढायचे कसे असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला.

उडीद,सोयाबीन,या बरोबरच तुरीच्या पिकात पाणी थांबल्याने याचा परिणाम तुरीचे पाने पिवळे पडत असून पान गळती सुरु झाली आहे  पिका बरोबरच शेतातील माती बांध या पावसात वाहुन गेले आहात. या  पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला असून त्याचे वर्षभराचे आर्थिक गणितच यामुळे कोलमडून पडले आहे.

महामार्ग व बायपास कामाचा शेतीला फटका!
तिर्थक्षेञ तुळजापूर चा आजूबाजूला चालु असणाऱ्या महामार्ग रस्ते काम करताना शेतीतील पाणी वाहुन जाण्यासाठी कुठलीही उपाययोजना न केल्याने पाणी आडुन ते शेतात घुसल्यानै यात शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देवुन ठेकेदारावर कारवाई ची मागणी होत आहे.

सरसगट पंचनामे करा
शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी अँपवर तक्रार करण्यास सांगितले जात आहे पण हे काम अशिक्षित शेतकऱ्यांना समजणे कठीण असल्याने पिकविमा काढुन तक्रार करता येणे कठीण बनल्यानै तो पिकविमा पासुन वंचित राहण्याची वेळ येणार आहे.त्यामुळे कोणत्याही जाचक अटी न लदत  राज्य सरकारने व कृषी विभागाने तात्काळ सर्वच शेतकऱ्यांचे सर सगट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीबळिरजा करीत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments