महर्षी करिअर अकॅडमी..

अकलूज दि.२७(क.वृ.): बारा हजार पाचशे मेगा पोलिस भरतीचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी व अनिवासी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र बॅच, 1 ऑक्टोबर पासून सुरू होत असल्याचे डॉ. आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. यावेळी डॉ विश्वनाथ आवड, संचालक अजित चंदनकर उपस्थित होते.
पुढे डॉ.आबासाहेब देशमुख म्हणाले की महर्षी अकॅडमीचे संचालक प्रा.अजित चंदनकर, एमपीएड नेशनल खेळाडू प्रा आशिष क्षीरसागर, गणित व बुद्धीमत्ता मार्गदर्शक गरगडे, नेशनल खेळाडू सचिन निळे, सागर पवार, संकेत गाडे, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.याकरिता 7420851924, 9422028838 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा असे म्हणाले.
वैशिष्ट्य- प्रत्येक विषयास तज्ञ मार्गदर्शक, लेखी व मैदानी चाचणीत 90% पेक्षा जास्त गुण घेणारे अकॅडमी विद्यार्थी, अभ्यासिका व ग्रंथालयाची सोय, प्रत्येक आठवड्यात घटक निहाय परीक्षा, मैदाने सरावासाठी सुसज्ज मैदान व दररोज क्रिडा तज्ञांकडून सराव, प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगळे प्रगती कार्ड व समुपदेशन, परगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांना दर 15 दिवसाला भरती पूर्व डेमो, सैन्य भरतीच्या उमेदवारासाठी हिंदी मधून लेक्चरची सुविधा, स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध, प्रशिक्षण वॆळी सोशलडिस्टन सॅनिटायजरचा वापर केला जाईल.
- कलावधी- 4 महिने अकॅडमी फी 9 हजार रुपये
- 6 महिने 12 हजार रुपये
- निवाशी अधिक भोजन फी
- मुलांसाठी प्रत्येकी महिना 3 हजार रुपये
- मुलींसाठी प्रत्येकी महिना 2 हजार पाचशे रुपये
0 Comments