बोरी व पाचुंदा प्रकल्प भरल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरचा वर्षभराचा पाणीप्रश्न संपुष्टात

तुळजापूर दि.२७(क.वृ.):- तालुक्याची जलवरदायनी संजिवनी ठरलेल्या नळदुर्ग जवळील बोरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर तिर्थक्षेञ अणदूर व नळदुर्ग या तिन्ही मोठ्या गावांचा व अणदूर भागातील शेतीसाठीचा पाणीप्रश्न मिटला असुन धरण भरुन सांडवा वाहु लागताच या तलावातील पाण्याचे जलपुजन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी रविवार दि.२७ रोजी केले.
तुळजापूर तालुक्यामध्ये यंदा सरासरी पर्यत पाऊस पोहचल्या, मुळे तुळजापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणारे बोरी प्रकल्प व त्याचबरोबर लातूर रस्त्यावर असणाऱ्या तुळजापूर शहरासाठी जुन्या काळामध्ये पाणीसाठयातुन पाणीपुरवठा केला जात होता ते पाचुंदा तलावा पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे तुळजापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे.
त्यामुळे सदर पाणिसाठ्याचे जल पूजनसदर तुळजापूर नगरीचे नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन ज्ञानोबा रोचकरी यांच्या शुभहस्ते आज दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आले.
आज नळदुर्ग येथील बोरी प्रकल्पात शंभर टक्के म्हणजे ३२.२८ फ़ुट इतका पाणी साठा झाला आहे. सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक श्री वैभव पाठक पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री अर्जुन माने व महादेव शिंदे हणमंत पुजारी समाधान जगताप किरण औताडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments