महिला बचत गटांची सक्तीची वसुली थांबवा-सरपंच बाळासाहेब ढाळे

महुद दि.५(क.वृ.): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले पाच महिने सरकारने लाँकडाऊनचा आवलंब केला त्यामुळे लहानमोठे उद्योग आडचणीत आले आहेत.मजुरांना काम धंदा नाही. त्यामुळे सर्वांचीच आर्थीक कोंडी झाली आहे. अशीच आवस्था महुद मधील महिला बचत गटांतील महिलांची झाली आहे.
आशा आवस्थेत बचत गटाचे वसुलदार हे महिलांना हाफ्त्यासाठी तगादा लावतात व महिलांना मानसिक त्रास देत आसल्याचे निदर्शनास आले असता महुद गावचे सरपंच बाळासाहेब ढाळे व उपसरपंच दिलीप नागणे यांनी महुद मध्ये वसुलीस आलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावुन घेतले व महुद गावातील व्यवसायाची व काम धंद्याची आवस्था बिकट आसलेचे निदर्शनास आणुन दिले, आता कुठे गावामध्ये आनलाँक-आंतर्गत व्यवसाय सुरु होत आहेत, आनेक महिलांना रोजगार उपलब्ध नाहीत,अशा अवस्थेत वसुलीसाठी तगादा लावणे गैर असल्याचे सांगून संबंधित बचत गटाच्या वरीष्ठांशी मोबाइल वरून संवाद साधुन त्यांना लेखी स्वरुपातही वसुली थांबवण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी ग्रामसेवक कोळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments