Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या तालुका कार्यकारिणीचा विस्तार

राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या तालुका कार्यकारिणीचा विस्तार


नूतन पदाधिकाऱ्यांचा दिपकआबांच्या हस्ते सत्कार

सांगोला दि.२७(क.वृ.): राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ या पदवीधर तरुणांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या तालुका कार्यकारिणीचा विस्तार नुकताच करण्यात आला यामध्ये सांगोला तालुका कार्याध्यक्ष म्हणून विशाल केदार तालुका उपाध्यक्ष म्हणून अकिब पटेल पवन गायकवाड यांची तर सांगोला शहराध्यक्ष म्हणून अक्षय स्वामी यांची निवड करण्यात आली.

रविवार दि.27 रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते या निवडी संपन्न झाल्या यावेळी राष्ट्रवादी सांगोला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी कोळेकर पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष अमोल सावंत सुयश बिनवडे यांच्यासह पदवीधर तरुण उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी उपस्थित पदवीधर तरुणांना मार्गदर्शन केले व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन जोमाने काम करण्याची सूचना दिली. 
Reactions

Post a Comment

0 Comments