जामगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

माढा दि.१९(क.वृ.):- 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तत्कालीन मुक्तापूर राज्याची राजधानी माढा तालुक्यातील जामगांव येथे गुरुवारी सकाळी भूमाता संघटनेचे अध्यक्ष मारुती जगदाळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा सरपंच सुहास पाटील यांच्या हस्ते विठ्ठलराव पाटील यांच्या पुरातन वाड्यावर मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुहास पाटील म्हणाले की,आजच्या युवा पिढीने थोर महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा ऐतिहासिक वारसा जतन केला पाहिजे तसेच शासनाने गावामध्ये स्मारक व स्फूर्ती स्तंभ उभारुन इतिहासाची प्रेरणा जागविण्यासाठी सहकार्य करण्याची आणि शासनाने दरवर्षी या ठिकाणी हा समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मारुती जगदाळे म्हणाले की, ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिले त्यांचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे परंतु दुर्दैवाने आज खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे व आपले प्रयत्न कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पोलिस पाटील प्रमोद पाटील,मोहन पाटील,श्रीकांत मुळे, मुख्याध्यापक अर्जून ताकभाते, रविराज पाटील,रमाकांत कुलकर्णी, विशाल पाटील, प्रफुल्ल पाटील,रमेश पाटील,धनाजी चव्हाण,विकास तोडकरी,मदन पाटील, हुसेन शेख, कल्याण बोबडे,गोरख चव्हाण, आगतराव चव्हाण यांच्यासह स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पाटील प्रशालेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक व वस्ती शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ गवळी यांनी केले.आभार शाहीर चव्हाण यांनी मानले.
0 Comments