मोबाईल रिटेलर असोसिएशन सोलापूर शहर (मास) च्या अध्यक्षपदी हिशाम शेख यांची निवड

सोलापूर दि.१९(क.वृ.): सोलापूर शहरातील मोबाईल असोसिएशनच्या अध्यक्षपदी हिशाम शेख यांची निवड करण्यात आली आहे. मोबाईल असोसिएशनच्या पदाधिकारी व संचालक मंडळ व सल्लागार समितीची महेश चिंचोळी (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात श्री. हुमा गिफ्ट्सचे मालक हिशाम शेख यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून विजय नवले व रवींद्र कोळी यांची तसेच सेक्रेटरी म्हणून विशाला कारंजे, सहसेक्रेटरी म्हणून सचिन पाटील, खजिनदार म्हणून गोविंद सचदेव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष महेश चिंचोळी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष हिशाम शेख व सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून अध्यक्ष हिशाम शेख यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छा देखील मिळत आहेत. निवडीप्रसंगी असोसिएशनचे प्रसन्न मेहता, सचिन पत्तेवार, अशोक आहुजा, राजू बिराजदार उपस्थित होते.
0 Comments