पूरग्रस्त भागात अन्नधान्य किट वाटप

अकलूज दि.२७(क.वृ.): मळवली येथील पूरग्रस्त भागातील २० कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील पाच- सहा गावांना पावसाचा भरपूर फटका बसला होता. त्या पावसात बऱ्याच लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले.
अशा लोकांना शाळेत राहण्याची वेळ आली.अशा या कठीण परिस्थितीत लोकांना मदतीची गरज होती, म्हणून या लोकांना मदतीचा हात पुढे करत २ कि.गहू, ५ कि.तांदूळ, अर्धा कि.तूर डाळ, १ कि.साखर, १ कि.शेंगदाणे, १ लिटर. तेल पुडा,१०० ग्राम चहा पुडा, १ लिटर.दूध पुडे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले.तर अशा लोकांना जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करून माणुसकीचे दर्शन घडवून द्यावे.
माझ्या या समाजकार्यात मला नेहमी मदत करणार्या लोकांचे तसेच विशेष करून आज मदतीसाठी सोबत आलेले माझे मित्र अक्षय जाधव, सौरभ वाघमारे, अमोल मेहता, विकास वाईकर, अविनाश जगदाळे, प्रशांत भोसले, रोहन कदम, या सर्वांचा मी आभारी आहेअशी भावना अविनाश सोनवणे यांनी व्यक्त केली.
0 Comments