मराठा सेवा संघाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ येथे वर्धापन दिन भविष्यातील धोरण ठरवत उत्साहात पार पडला


मोहोळ दि.३(क.वृ.): उद्योजक कक्षाचे तालुकाध्यक्ष शिवश्री विष्णू थिटे साहेब यांच्या मोहोळ एम.आय.डी.सी जवळ लोकनेते नांगर महाराष्ट्र ऍग्रो मॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिवश्री सूर्यकांत मोरे (कृषी अधिकारी मोहोळ) हे होते. तसेच सेवा संघाचे कार्याध्यक्ष चटके साहेब, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष साठे सर, जिल्हा सदस्य शिवश्री संतोष गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष वैभवबापू गुंड, नगरसेवक प्रमोदबापू डोके, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक देशमुख सर, सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रभाकर शिंदे तसेच डॉक्टर कक्षाचे कोषाध्यक्ष शिवश्री अमोल पाटील, संघटक डॉ अमोल लांडे आणि वकील कक्षाचे शिवश्री श्रीरंग लाळे वकील उपस्थित होते.*
जिजाऊंच्या प्रतिमेचे आणि शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. यानंतर शहीद जवान, कोरोनामुळे मृत झालेले तसेच संघटनेचे मृत कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन शिवश्री आकाश फाटे यांनी केले, तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शिवश्री मनोजकुमार मोरे यांनी केले.
कार्यक्रमात संघटनेचे पुढीलधोरणात्मक उद्दिष्टे राबविण्यात येतील. उदाहरणार्थ:- ग्राम शाखा निर्माण करणे, जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा तालुकाभर करणे,"शिवधर्म गाथा, शिव चरित्र, जिजाऊ चरित्र, शंभू चरित्र आणि संघटनेच्या विचारांच्या पुस्तकांचा तसेच जिजाऊ, बळीराजा, तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचा प्रसार प्रचार करणे, सेवा संघाचे तालुक्याला ऑफिस करणेबाबत, तसेच विद्यार्थी आणि उद्योजक यांना मार्गदर्शनपर शिबिर, पदाधिकारी यांना ऑनलाइन मार्गदर्शनपर शिबीर तसेच केडर कॅम्पचे आयोजन, ग्रामीण भागात समाजहिताचे उपक्रम राबवणे आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करणेबाबत...
याकार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संघटनेवर प्रेम करणारे शिवप्रेमी मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंग ठेवून मीटिंगमध्ये उपस्थित होते.
साठे सर, चटके साहेब, लाळे वकील साहेब आणि थिटे साहेब यांनी संघटनेच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
पदाधिकारी निवड करण्यात आली. मोहोळ तालुका शहराध्यक्षपदी शिवश्री विक्रांत मांडवे, खजिनदारपदी शिवश्री रणधीर देशमुख, प्रसिद्धी प्रमुख पदी शिवश्री आकाश महाडिक आणि शिक्षक परिषदेच्या खजिनदारपदी शिवश्री निरंजन धावणे यांची निवड करण्यात आली. यानंतर अध्यक्षीय भाषणानंतर शिवश्री आकाश फाटे यांनी आभार व्यक्त केले.
लोकनेते नांगर चे मालक थिटे साहेब यांच्यावतीने चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कार्याची यशोगाथाची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. यानंतर थोड्यावेळ संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुढील उद्दिष्टांवर चर्चा करत काही सभासदांची नोंदणी करून हा कार्यक्रम समाप्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सेवा संघाचे तालुका सचिव शिवश्री विशाल देशमुख, शिक्षक परिषदेचे सचिव शिवश्री सुरज धनवे, वधू-वर कक्षाचे कार्याध्यक्ष धनराज फाटे, संपर्कप्रमुख दादासाहेब नागणे या सर्वांनी श्रम घेतले.
0 Comments