Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

 सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू


सोलापूर, दि.३(क.वृ.): सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2020 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रेझेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणेव्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्राप्रतिमा यांचे प्रदर्शन करणेसार्वजनिक घोषणा करणेअसभ्य हावभाव करणेग्राम्य भाषा वापरणेसभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातीलत्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईलसोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवातसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारीपोलीस अधीक्षक (ग्रा.)उपविभागीय दंडाधिकारीउपविभागीय पोलीस अधिकारीपोलीस निरीक्षकदुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.  

Reactions

Post a Comment

0 Comments