नॅशनल हायवेवर काम करणाऱ्या जी.आय.आर एल, डी.बी.एल कंपनीच्या ओव्हरलोड वाहनांवरती कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन : मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर

सांगोला दि.१७(क.वृ.): कोणतेही विकासकाम सुरु होत असताना पर्यावरणाची व कोणतीही जीवित हानी होणार नाही याची कायद्यानुसार होणार नाही याची कायद्यानुसार काळजी घेतली जात असते. परंतु सांगोला तालुक्यांमध्ये नॅशनल हायवे चे कामकाज सुरू आहे.
हे सुरू असताना या रोडच्या कामासाठी लागणारा मुरूम, माती, खडी व आदी साहित्य साहित्य कन्ट्रक्शन धारक ओव्हरलोड गाड्या भरून नेताना दिसत आहेत आहेत. यामुळे सांगोला तालुक्यातील व शहरांमधून जात असताना या ओव्हरलोड गाड्यांचे अनेक वेळा अपघात घडलेले आहेत तरीही या प्रकाराकडे संबंधित जी आय आर एल, डी बी एल या कंपन्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कंपनीच्या वाहनांचे ड्रायव्हर स्वतःच्या बापाचा रोड असल्यासारखी वाहने चालवत आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यांमध्ये अपघात होत आहेत. त्यामध्ये काही जणांना अपंगत्व सुद्धा आले आहे.
बऱ्याच वेळा अपघात झाल्यानंतर वाहन चालक तसेच वाहन भरधाव घेऊन निघून जातात. त्यामुळे या कंपन्यांवर ती भारतीय दंड संहिता वाहन कायद्यानुसार योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगोला तालुक्यात सांगोला तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सुरक्षा समितीचे चिटणीस विनोद बाबर यांनी दिली. त्या संदर्भात निवेदन उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांच्याकडे निवेदन सादर केलेले आहे.
निवेदन देतावेळी माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर तसेच मनसेचे आदी पदाधिकारी उपस्थित पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments