आलियाबाद येथे 'माझे कुंटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु

तुळजापूर दि.२१(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायतीच्या वतीने संपुर्ण गावात घरोघरी जाऊन 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू करण्यात आली.
कोरोना संकट वरचेवर वाढत चालल्याने याचा शिरकाव रोखण्यासाठी सरकारने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत कोरोना विषयी जनजागृती करुन सर्व कुटुंबाचे तपासणी करण्यात येणार आहे.
आलियाबाद येथे संरपच ज्योतीका चव्हाण यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आशा कार्यकर्ती रिषा राठोड, हॅलो फाऊंडेशन कार्यकर्ती रिना चव्हाण, अनिकेत राठोड,शानु राठोड,आदि उपस्थित राहून मोहीम सुरू केली आहे.
0 Comments