Hot Posts

6/recent/ticker-posts

धनगर आरक्षण आंदोलनाची ज्योत श्रीतुळजाभवानी दारातुन प्रज्वलित

धनगर आरक्षण आंदोलनाची ज्योत श्रीतुळजाभवानी दारातुन प्रज्वलित


तुळजापूर दि.२१(क.वृ.):- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवार्गात समाविष्टमध्ये समाविष्ट करण्याचा मागणीसाठी मल्हार आर्मी तर्फ महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीर ज्योत प्रज्वलन करुन राजेशहाजीमहाध्दार समोर धनगर समाजाचा एस टी मध्ये समाविष्ट करण्यासाठी रणशिंग फुंकण्यात आले. 

श्रीतुळजाभवानी दारी धनगर आर्मीने पेटवलेली आरक्षण ज्योत आरक्षण मिळे पर्यत आंदोलन रुपात तेवतच ठेवली जाणार असुन धनगर समाजालान्याय न दिल्यास धनगर बांधव मंञ्याच्या गाड्या पेटवतील असा इषारा यावेळी मल्हार आर्मीचै संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात देवी दिला.

प्रथमता श्रीतुळजाभवानी मातेचे महाध्दार मधुन देवीचे दर्शन घेवुन  देवीदारी  जयभवानी जय शिवाजी जय राजमाता आहील्यादेवी होळकर जय मल्हार यांचा जयजयकार करीत भंडा-याची उधळण करीत  जय धनगर समाजाला एस.टी. प्रवार्गात आरक्षण मिळालेच पाहिजै या घोषणा देवुन परिसार दणाणून सोडला .

यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सुरेश कांबळे पुढे म्हणाले की, मागील सत्तर वर्षापासून धनगर समाज एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी शंततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. परंतु प्रत्येक राजकिय पक्षसमाजाचा तोंडाला पानी पुसत आहे. या फसवणूकिला यापुढे धनगर समाज बळी पडणार नाही धनगर समाजाला आरक्षण माध्यमातून न्याय न दिल्यास देवीदारी आंदोलनाची पेटवलेली ज्योत राज्यभर फिरवून आरक्षणासाठी जनजागृती केली जाणार आहे. त्याची सुरुवात आज श्रीतुळजाभवानी दारातुन केल्याचे ते शेवटी म्हणाले. 

यावेळी सुरेश भाऊ कांबळे, बाळासाहेब मामा बंडगर, गणपत देवकते, काकासाहेब मारकड समर्थ पैलवान,आण्णा बंडगर, प्रमोद दाणे,वैभव लकडे, प्रशांत गावडे,आदित्या पैलवान, शाहजी हाक्के, चैतन्य बंडगर,सह मल्हार आर्मीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments