अल्पसंख्याक समितीवर प्रतिनिधी नियुक्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

सोलापूर, दि.२१(क.वृ.): जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती नव्याने स्थापन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि अल्पसंख्याक समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुक प्रतिनिधींनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
इच्छुक संस्थेच्या प्रतिनिधींनी संस्थेची माहिती, कार्याचा तपशील, संस्था मंजुरीची कागदपत्रे, संबंधित व्यक्तीचा पोलीस विभागाकडील चारित्र्य पडताळणी दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक कल्याणाशी निगडीत संस्थांचे प्रतिनिधींची नावे शासनाच्या अल्पसंख्याक विभागाला कळविण्यात येणार असून नियुक्त होणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींना कोणतेही मानधन आणि बैठक भत्ता देण्यात येणार नाही, असेही श्री. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 Comments