Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तीन आस्थापना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी 



सोलापूरदि.२(क.वृ.)सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नयेयाकरिता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादक आस्थापना ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी डीसीएचडीसीएचसी आणि खाजगी रूग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठासिलेंडरसंक्शन यंत्रणा आणि पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा तत्काळ व सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोना रूग्णांवर वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक व साठा करणाऱ्या आस्थापना अधिग्रहित करण्यात आल्या असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

अर्निकेम इंडस्ट्रीजचिंचोळी एमआयडीसीसोलापूर (अधिकारी-राहुल आराध्ये-8669537999)एल.आर. इंडस्ट्रीज, चिंचोळी एमआयडीसीसोलापूर (अधिकारी-शेषगिरी देशपांडे-7892141288/9881454649) आणि एस.एस. बॅग्ज व फिल्टर्सटेंभुर्णी (अधिकारी-राजाराम शिंदे-9881338327) या ऑक्सिजन उत्पादक व साठा करणाऱ्या आस्थापना अधिग्रहित केल्या आहेत.

आस्थापनांनी खालीलप्रमाणे निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

  • आस्थापनामधील उत्पादित ऑक्सिजन साठा व बाहेरून आणलेला वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा आस्थापनेच्या व्यवस्थापनासह अधिग्रहित करण्यात येत आहे. पुढील आदेशापर्यंत औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार नाही.
  • आस्थापनांनी त्यांचे उत्पादक पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे. आस्थापनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
  • वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन व विक्री करण्यासाठी लागणारे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहेत्यांनी घ्यावे.
  • उत्पादित ऑक्सिजनचा पुरवठा सोलापूर जिल्ह्यात करावा. अन्य जिल्ह्यात पूर्व परवानगी घेणे सक्तीचे आहे.
  • परराज्यात होणारा पुरवठा तत्काळ थांबविण्यात यावा.
  • कोणत्याही परिस्थितीत कोविड संसर्गापूर्वी असलेल्या ऑक्सिजन दरामध्ये वाढ करता कामा नये.

Reactions

Post a Comment

0 Comments