सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2020

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड

 सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड


सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा मार्ग न्यायालयातून मोकळा झाल्यानंतर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप 
माने यांचे नाव एकमताने निश्चित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झाली असून, या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुखे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक उपस्थित होते. आपल्याला कामाचा व्याप असल्याने आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे आमदार संजय शिंदे यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. माजी आमदार माने यांचे नाव एकमताने निश्चित झाले असून, अध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया झाली आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages