Ads

Ads Area

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला खाजगी मालकाच्या घशात घालण्याचा विरोधकांचा डाव : ॲड. मिलींद कुलकर्णी

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला खाजगी मालकाच्या घशात घालण्याचा विरोधकांचा डाव : ॲड. मिलींद कुलकर्णी 


अकलूज दि.२(क.वृ.):- सदाशिवनगर, ता. माळशिरस येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व संचालकांविरूध्द वारंवार तक्रारी करून, विविध खोटे आरोप करून हा कारखाना खाजगी मालकाच्या घशात घालण्याचा डाव तालुक्यातील विरोधक करत असल्याचा आरोप कारखान्याचे व्हा . चेअरमन ॲड . मिलींद कुलकर्णी यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेत केला.
ॲड. कुलकर्णी म्हणाले , सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांनी  स्वत:ची शेती, दागदागिने बँकेकडे गहाण ठेवून एका खाजगी मालकाकडील कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. गत चार वर्षे हा कारखाना बंद होता. तो लिक्वीडेशन  मध्ये निघू नये, तो पुन्हा सुरू व्हावा. या भागातील शेतकरी, सभासद, कामगार यांचे संसार पुन्हा फुलावेत या हेतूने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याची निवडणुक लावली . कारखान्याच्या सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कारखान्याच्या संचालक मंडळाला विजयी केले व त्यांच्या हातात दि. १० डिसेंबर २०१८ रोजी कारखान्याची सुत्रे दिली. चार वर्षे बंद असलेला व सुमारे २५० कोटी रूपये कर्ज असलेला हा कारखाना रणजितदादांनी मोठ्या धाडसाने ताब्यात घेतला.
या कारखान्याच्या निवडणुकीला व निवडुून आलेल्या संचालक मंडळाला आज जवळपास १८ महिने झाले
आहेत. या १८ महिन्यातील सुमारे ३ महिन्यांचा कालावधी हा लोकसभा निवडणुकीत गेला. लोकसभेची आचारसंहिता व निवडणुक पार पडते तोपर्यंत विधानसभेची निवडणुक जाहिर झाली. या निवडणुकीचे २ महिने व सरकार स्थापन होण्यात ३ महिन्यांचा कालावधी गेला. सरकार स्थापन झाले. तोपर्यंत संपुर्ण देशाला व जगाला कोरोना या महाभयंकर विषाणुने ग्रासले. या कोरोनात ६ महिने गेले. कोरोनाच्या काळात शासकिय कार्यालयात सुरूवातील १० टक्के कर्मचारी व अधिकारी वर्गाची उपस्थिती होती. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील व देशातील सरकार हे कोरोनामुळे अद्याप सावरलेले  नाही.श्री शंकर सहकारीचे संचालक मंडळ स्थापन होऊन १८ महिने झाले. या १८ महिन्यांपैकी १४ महिने हे लोकसभा, विधानसभा व कोरोनत गेल्यानंतर या संचालक मंडळाकडे केवळ ४ महिन्याचा कालावधी हातात राहिला असताना संचालक मंडळाला प्रामाणिकपणे काम करू न देता त्यांना वारंवार अडचणी कशा निर्माण होतील हेच काम सध्या तालुक्यातील विरोधक मंडळी प्रामाणिकपणे करताना दिसत आहेत .  प्रत्येक आठ दिवसांतून कोणती ना कोणती तक्रार करणे, संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करणे अशा खोड्या करत असताना एका बाजुला मात्र आपणाला शेतकऱ्यांचा फार कळवळा आहे हे दाखवण्याचा ते केविलवाना प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले . सध्या तालुक्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर जमीन अधिग्रहणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गात श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची जागा जात आहे. या जमिनीचा मोबदला मिळाल्यावर ती रक्कम ज्या शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम कारखान्याकडे थकली आहे, त्यांना देऊन टाकण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असताना तालुक्यातील विरोधक मंडळी मात्र ही रक्कम कारखान्याला न मिळता ती बँकेकडे वर्ग करावी यासाठी राज्य बँकेकडे पत्रव्यवहार करताना दिसत आहेत.
वास्तविक पाहता कारखान्याने चांदापूरी व शिंदेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची कारखान्याकडे थकलेली एफआरपीची रक्कम देण्याचा संचालक मंडळाचा मानस असताना तालुक्यातील विरोधक मात्र शेतकऱ्यांच्याच मुळावर उठल्याचे यातून स्पष्ट होत आहे. विरोधकांनी चेअरमन व संचालक मंडळावर केलेल्या आरोपाचे निराकारण करताना ॲड कुलकर्णी म्हणाले ,  चेअरमन व संचालक मंडळावरती जी तक्रार आता विरोधकांनी केली आहे, ती यापुवींच साखर आयुक्तांनी व निवडणुक अधिकारी यांनी त्यात तथ्य नसल्यामुळे काढुन टाकली आहे. तीच तक्रार पुन्हा पुन्हा पुन्हा विरोधक करीत आहेत. परंतु गत १८ महिन्यांमध्ये कारखाना सुरू व्हावा, शेतकऱ्यांची थकहमीची रक्कम परत मिळावी यासाठी विरोधकांनी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत .  यांना जर खरेच शेतकऱ्यांबद्दल काळजी असती तर त्यांनी चेअरमन व संचालकांच्या कामात अडथळे आणले नसते. त्याचबरोबर भानुदास सालगुडे-पाटील यांना स. म. शंकरराव मोहिते-पाटील सर्व सेवा संघामार्फत ऊस गळीत हंगाम २०११-१२ साली ऊस तोडणी यंत्रासाठी १७ लाख रूपये देण्यात आले होते. त्यापैकी ११ लाख ७७ हजार ९६१ रूपये अद्यापी येणे बाकी आहेत. या गोष्टीही तालुक्यातील शेतकऱ्यांना समजायला हव्यात असे सांगून एकंदरीतच श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुरू न होता तो वारंवार अडथळे निर्माण करून, लिक्वीडेशनमध्ये काढून, संचालक मंडळ बरखास्त करून खाजगी मालकाच्या घशात घालायचा कट विरोधकांनी आखला आहे . परंतु हा त्यांचा कट यशस्वी होणार नाही . या कारखान्याच्या सभासद , कामगारांचा  विजयदादा व रणजितदादांवर विश्वास आहे . त्यामुळे संचालक मंडळ यातून मार्ग काढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close