वीज बिल माफीसह वाढीव बिलाच्या संदर्भात मनसेने कळब चे महावितरण कार्यालय फोडले !


कळंब दि.२(क.वृ.): वीज बिल माफीसह वाढीव बिलाच्या संदर्भात मनसेने कळंब च्या उप विभागीय महावितरण कार्यालय फोडुन चांगलाच धुडगूस घातला यात महावितरणाचे पन्नास हजारावर नुकसान झाल्याची तक्रार कळंब पोलीसात दिल्याने चार जनाविरूध गुन्हा नोंद करून संबधीतांना अटक करून न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोटडी सुनावली आहे.
वीज बिल माफीसह वाढीव बिलाच्या संदर्भात मनसेने महावितरण कार्यालयात १ सष्टेंबर रोजी दुपारी चांगलाच राडा करून कार्यालयाचा काचा फोडल्या.
सध्या महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व लॉकडाऊन मुळे जनता त्रस्त आहे त्यातच वाढीव लाईट बिल येणे,अवेळी जाणारी वीज,महावितरण चा न लागणारा फोन अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ‘वीज बिल माफ करा’ या मागणीसाठी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळंब शहरातील महावितरण च्या उपविभागीय कार्यालयात तुफान राडा केला आहे.यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महावितरण कार्यालयातील केबिन आणि फर्नीचरची तोड़फोड़ केली आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान झालेले आहेत. यातच रोजगार नसल्याने जगणे अवघड झाले आहे. सतत निवेदन देऊनही शासन आणि महावितरणने दुर्लक्ष केल्याने केले हे आंदोलन केल्याच्या भावना संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यावर साहयक अभियंता वैभव गायकवाड यांनी कंळब पोलीसात महावितरण कार्याल्याचे पन्नास हजार रूपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद मनसेचे तालुकाध्यक्ष नारायण बारकुल, अमोल राऊत,रामेश्वर थोरात ,कृष्णा गंभीरे यांच्या विरूध फिर्याद देऊन पोलीसांनी गु.र.न. २२१ / २० कलम ३५३,१८८,२६९ या सह भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून यांना ताब्यात घेतले आहे.दि २ सष्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले आसता न्यायालयाने ४ सष्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत त्यांची रवानगी केली आहे या पुठचा तापास पोलीस उपनिरिक्षक सी. एस. गुसिंगे हे करत आहेत.
0 Comments