लिंगायत-वाणी जातीसह अन्य जाती अडकल्या जून्या पुराव्याच्या कचाट्यात..!

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जाचक अटी रद्द कराव्यात म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून जायफळ येथे अमरन उपोषण..!!
कळंब दि.२(क.वृ.): जात प्रमाणपत्र काढण्यासाठी १९६७ चा शैक्षणीक व महसूली पुरावा तात्काळ रद्द करावा. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (दि.१७ सप्टेंबर) पासून कळंब तालुक्यातील मौजे जायफळ येथे राहात्या घरीच तरूण अमरण उपोषण करणार आसल्याचे निवेदन कळंब उपविभागीय महसूल अधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दि. १ सप्टेंबर २०२० रोजी देण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, लिंगायत वाणी या जातीसह अन्य दहा जातीचा सामावेश २०१४ रोजी ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आला आहे. लिंगायत वाणी जातीचा सामावेश ओबीसी प्रवर्गात ५ वर्षापूर्वीपासून करण्यात आला आहे. विशेष करून अनेक लिंगायत वाणी जातीच्या बांधवाकडे १९६७ पूर्वीचा शैक्षणिक व महसूली पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे लिंगायत वाणी जात आसणाऱ्या हजारो बांधवांना लिंगायत वाणी या जातीच्या प्रमाणपत्रा पासून वंचीत राहावे लागत आहे. काहींचे जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामध्ये जून्या पुराव्यासाठी धुळखात पडून आहेत. त्यामुळे लिंगायत वाणी जात असूनही प्रशासनाच्या जाचक अटीमुळे हजारो लिंगायत विद्यार्थ्यांना, बांधवांना ओबीसी प्रवर्गातील विविध सवलतीपासून वंचीत राहावे लागत आहे.
मराठा, धनगर, अनुसूचीत जाती व जमातीच्याही अनेक बांधवाकडे जूने पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या जात प्रमाणपत्रा पासून वंचीत राहावे लागत आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शपथपत्र व मंडळ अधिकाऱ्यांच्या स्थानिक पंचनाम्याच्या अहवालावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनापासून( दि.१७ सप्टेंबर २०२०) कळंब तालुक्यातील मौजे जायफळ येथे राहात्या घरीच पत्रकार नरसिंग खिचडे, ग्राम पंचायत सदस्य शंभूहार बिडवे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. वैजिनाथ शेटे हे अमरण उपोषण करणार आहेत. असे निवेदन कळंब उपविभागिय महसूल आधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, उस्मानाबादचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. कौस्तूभ दिवेगावकर, खासदार ओमराजे निंबाळकर, कळंब-उस्मानाबाद आमदार कैलास घाडगे-पाटील, कळंब तहसिल कार्यालय यांना देण्यात आले आहे. निवेदना देताना कळंब पंचायत समितिचे उपसभापती गुणवंतराव पवार या वेळी उपस्थित होते.
0 Comments