नवजात शिशू आणि महिला रूग्णालयासाठी 31 कोटी रूपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव सादर

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 15 ऑगस्टच्या बैठकीत जिल्ह्यात वाढणाऱ्या कोविड रूग्णांची संख्या पाहता शासकीय आणि खाजगी दवाखान्यातील बेड कमी पडू नयेत. याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. वाढीव रूग्णांसाठी 100 खाटांचे नवजात शिशू आणि महिला रूग्णालय, 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयाचे काम तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही दवाखान्यांचे काम गतीने सुरू आहे. दवाखान्यांची कामे वेळेपूर्वी पूर्ण होण्यासाठी सुमारे 31 कोटी 36 लाख 75 हजारांचा निधीची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आरोग्य सेवाचे उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
शासनाकडून त्वरित निधी मिळाल्यास दोन्ही रूग्णालयांचे काम तातडीने होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
0 Comments