जनसेवा संघटनेच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा संपन्न

अकलूज दि.१६(क.वृ.): कोरोना विषाणुच्या संकट काळात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता.त्यावेळी डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेने संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या सर्व शिबीरात सुमारे २५०० रक्तदात्यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना अशा कठीण प्रसंगात निर्भीडपणे घराबाहेर पडुन रक्तदान केले आहे होते. खऱ्या अर्थाने योद्धया सारखेच काम केले आहे म्हणुन रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे हस्ते कोवीड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व सन्मानपत्र वाटपाची औपचारिक सुरवात करण्यात आली. यावेळी तालुक्याचे युवा नेते संकल्प हणुमंतराव डोळस, शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे चेअरमन सतिश नाना पालकर, शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर, जनसेवा संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, युवक नेते धनाजी साखळकर,नवनाथ भाऊ साठे, विठ्ठल इंगळे, मोहसीन बागवान, अली शेख, विजय खंडागळे, बाळु साठे तय्यब मौलाना,जोतीताई कुंभार, रूपाली गांधी,विवेक शिदे, अजिनाथ जाधव,महेश शिंदे,तेजस उबाळे आब्बास शेख अक्षय कोकाटे मयुर माने सागर देशमुख राहुल जाधव, निहाल शेख, सुधीर रास्ते उपस्थित होते.
0 Comments