Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार रणजितसिंहांची संकल्पना, रुग्णसेवेचा पथदर्शी अकलूज पॅटर्न जन्मास आला

 आमदार रणजितसिंहांची संकल्पना, रुग्णसेवेचा पथदर्शी अकलूज पॅटर्न जन्मास आला


अकलूज(विलास गायकवाड)दि.१६(क.वृ.): मेडिकल हब म्हणून अकलूज विख्यात आहेच. सामाजिक जानही अकलूजकरांमध्ये ठासून भरलेली आहे. माळशिरस तालुक्यातील कोरोना बाधित अत्यावस्थ रुग्णांना सुलभरीत्या उपचार मिळावेत यासाठी अकलूज व माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांनी पुढे यावे अशी हाक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,धैर्यशील मोहिते-पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, अकलूज चे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली होती. त्यानुसार येथील इंडियन मेडिकल असोसिएशन  व इतर सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन ५० लाखांचा रोख निधी उभारला आहे. दिढ कोटी पर्यंतची यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशासनानेही या सत्कार्यास मोठा हातभार लावला आहे. येथे १०० खाटांचे अकलूज कोवीड हॉस्पिटल उभे राहिले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटनही झाले आहे.  यावेळी कलेक्टर मिलिंद शंभरकर, डिप्टी कलेक्टर शमा पवार यांच्यासह अकलूज मधील सर्व सन्माननीय डॉक्टर्स ,पदाधिकारी उपस्थित होते.स्वातंत्र्यदिनाच्या औचीत्यावर खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेले अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच हॉस्पिटल असून ते राज्याच्या रूग्णसेवेला नवी दिशा देणारे असणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments