सोलापूर जिल्हा काँग्रेस ची आढावा बैठक...
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी केले मार्गदर्शन....
सोलापूर दि.८(क.वृ.): सोलापूर जिल्हा काँग्रेसची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सात रस्ता येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाला.... सुरुवातीस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील यांच्या वडील स्व. शामराव पाटील यांचे निधन झाल्यामुळे माळशिरस. यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.. सभेचे स्वागत प्रास्तविक सातलिंग शटगार यांनी केले...माजी मंत्री श्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते महिला बालकल्याण सभापती सौ यशोमती ठाकूर. व प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक तालुक्यातील पधाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले... जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी ग्रामीण भागातील काँग्रेसच्या संघटना बांधणी यावर सविस्तर चर्चा केली.... जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती श्री मल्लिनाथ महादेव पाटील यांनी विचार व्यक्त केले. सांगोला तालुक्यातील श्री पवार यांनी. तालुक्यातील आढावा थोडक्यात सांगितले.. जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सिद्राम सलवदे यांनी कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कमिटी वर नेमणूक करा असे सांगितले यावेळी दादा साठे...सौ मीनल साठे जिल्हाध्यक्षा शाहीन शेख यांनी मनोगत व्यक्त केले... अक्कलकोट चे दिलीप बिराजदार.... युवक काँग्रेस चे प्राध्यापक सातपुते सर जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी मुद्धेसुद विचार मांडले या बैठकीत सिद्धाराम म्हेत्रे साहेबाना विधान परिषदेवर घ्या अशा प्रकारचे ठराव करण्यात आले... यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की आघाडी सरकार तीन पक्षाचे मिळून आहे सरकार चांगले काम करत आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले शासकीय कमिट्या करताना तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी वारंवार दौरे होणार आहेत मागील सरकारने नुसते आश्वासन दिले जनतेचे काम केले नाही कार्यकर्त्यांनी गोर गरिबांचे कामे करावी... असे सांगितले.. महिला व बालकल्याण मंत्री म्हणाले की पक्षाने तुम्हांला पद दिलेला त्याचा वापर गोर गरीबाच्या कामासाठी करा.. यश नक्की मिळेल.. नवीन कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या असे सांगितले माजी मंत्री म्हेत्रे साहेबांनी म्हणाले की देगाव जोड कालव्यासाठी निधीची गरज आहे दक्षिण व अक्कलकोट तालुक्यातील नदीवर बंधारे बांधण्यासाठी निधीची गरज आहे निधी मिळवून द्यावे असे सांगितले.... यावेळी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरिष पाटील नंदकुमार पवार. जि प सदस्य संजय गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन तात्या पाटील महिला बालकल्याण सभापती स्वाती शशिकांत शटगार. जि प सदस्य श्रीशैल नरोळे सुदर्शन अवताडे हणमंत पाटील अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षा मंगलताई पाटील शशिकांत शटगार. शिवानंद पाटील अकलकोट शहर अध्यक्ष भीमा कापसे भीमाशंकर जमादार उपाध्यक्ष बसवराज बगले. विश्वनाथ ह्डलगी.. दिलीप बिराजदार विलास गव्हाणे बिडवे सर. संध्याताई काळे आदी उपस्थित होते.. सूत्रसंचालन सातलिंग शटगार यांनी केले आभार बसवराज बगले यांनी मानले.
0 Comments