शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.२८(क.वृ.): राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा येथे राज्य व्यवसाय शिक्षण मंडळांतर्गत शिवणकाम, कर्तन आणि फॅशन डिझायनिंग या व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महिला व पुरूष विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक एम.एस. उडाणशिवे यांनी केले आहे.
आत्मनिर्भर बनण्यासाठी हे प्रशिक्षण उत्तम पर्याय आहे. महिला व पुरूषांना या प्रशिक्षणानंतर स्वत:चा व्यवसाय करता येईल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळत असून बचत गट निर्मिती करता येते. प्रशिक्षणामध्ये शिवणचे विविध प्रकार, टिपा मारणे, रंगसंगती, कपड्यावर कलाकुसर, विविध प्रकारचे कपडे शिवणे शिकवले जाते. प्रशिक्षणासाठी 10 वी उत्तीर्ण आवश्यक असून सहा महिन्याकरिता 480 रूपये शुल्क असणार आहे. अधिक माहितीसाठी मंजुषा पाटील (7972120869) यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments