विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण

उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ निर्मिती
अकलूज दि.२८(क.वृ.): कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी शारीरिक व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था आनंदनगर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या उद्योग महर्षि कै.उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवशंकर बझार च्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, सौ.ईश्वरीदेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, अमायरा किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, आर्यवीरसिंह किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या जगभराबरोबरच भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. अकलूज बरोबरच माळशिरस तालुक्यातही कोरोनाचा विळखा चांगलाच वाढताना दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी किंवा त्यापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सकस आहाराबरोबरच व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन श्री.क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील यांनी स्व.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ खुल्या व्यायाम शाळेची निर्मिती केली आहे. निसर्गरम्य वातावरणात, पर्यटकांच्या लाडक्या श्री आनंदी गणेश मंदिराच्या पायथ्याशी प्रशस्त खुल्या जागेत सर्व प्रकारच्या शारीरिक व्यायामासाठी लागणारी अत्याधुनीक यंत्रसामुग्री येथे बसविण्यात आली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments