डीसीएचसी, डीसीएचमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी, सहायक नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर, दि.३१(क.वृ.): जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, ऑक्सिजन सिलेंडर, संक्शन यंत्रणा आणि पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा तत्काळ व सतत पुरवठा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समन्वय अधिकारी, सहायक तालुका नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
यापूर्वी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांची समितीचे समन्वय अधिकारी, समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव आणि एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड यांचा समावेश होता. आता त्यांना मदत करण्यासाठी सहायक तालुकानिहाय नियंत्रण अधिकारी नियुक्त केले आहेत.
पुढीलप्रमाणे कामे करणे अपेक्षित आहे
- नेमून दिलेल्या डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहत सुरू राहील, यासाठी पुरवठादार आणि कोविड केंद्रे, रूग्णालये यांच्याशी समन्वय ठेवणे.
- नेमून दिलेल्या डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात रूग्ण संख्येनुसार ऑक्सिजन आणि सिलेंडरची मागणी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून निश्चित करून पुरवठादाराकडे पाठपुरावा करणे.
- ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करणे.
- नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात वाढ किंवा घट झाल्यास त्याप्रमाणे नियोजन करून ऑक्सिजन पुरवठा अव्याहत सुरू ठेवणे.
- समन्वय अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन मागणी आणि पुरवठा याचा दैनंदिन अहवाल जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाला दुपारी 3 वाजेपर्यंत पाठवावा.
समन्वय अधिकारी आणि सहायक नियंत्रण अधिकारी
समन्वय अधिकारी | क्षेत्र | सहायक नियंत्रण अधिकारी | रूग्णालये |
अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव (9495783636) | सोलापूर महानगरपालिका | सहायक गटविकास अधिकारी श्रीमती रंजना कांबळे (9822468776) | यशोधरा हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पर्श न्युरो आणि सुपर स्पेशालिटी, एस.पी. इन्स्टिट्युट ऑफ न्युरो सायन्स, बिनित हॉस्पिटल, गंगामाई हॉस्पिटल. |
|
| प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सोलापूर. | श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सीएनएस हॉस्पिटल, अश्विनी सहकारी रूग्णालय, धनराज गिरजी हॉस्पिटल, एस.एस. बलदवा न्युरो सायन्स, चौधरी चिल्ड्रेन हॉस्पिटल, तेरा मैल, अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, कुंभारी |
एमआयडीसीचे उपअभियंता श्री. कोलप (9422049988) | अकलूज | सहायक गट विकास अधिकारी एस.जे. पाटील (9921999499) | अकलूज क्रिटी केअर ॲन्ड ट्रामा सेंटर, राने हॉस्पिटल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नवीन बांधकाम इमारत, अश्विनी हॉस्पिटल, कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अभय क्लिनिक, गुजर हॉस्पिटल, सन्मती हॉस्पिटल, ग्रामीण रूग्णालय, माळशिरस. |
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे (7058036876) | पंढरपूर | सहायक गटविकास अधिकारी एस.के. पिसे (9096828870) | अपेक्स हॉस्पिटल, गॅलक्सी हॉस्पिटल, जन कल्याण हॉस्पिटल, श्री गणपती हॉस्पिटल, श्री विठ्ठल हॉस्पिटल, उपजिल्हा रूग्णालय, लाईफलाईन हॉस्पिटल. |
औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे (7058036876) | बार्शी | सहायक गटविकास अधिकारी संजय बुवा (9495570931) | सुश्रूत हॉस्पिटल, जगदाळेमामा हॉस्पिटल, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सोमानी हॉस्पिटल, श्रीराम हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, हिरेमठ हॉस्पिटल, बार्शी. संत लुकेस हॉस्पिटल, नान्नज, ता. उत्तर सोलापूर. |
उत्तर सोलापूर |
| ||
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते (9422212312) | सोलापूर महानगरपालिका | उद्योग निरीक्षक ए.जी. साळुंखे | ईएसआय हॉस्पिटल, लोकमंगल हॉस्पिटल, सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ चिडगूपकर हॉस्पिटल, डॉ रघोजी किडनी हॉस्पिटल, युगांधर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मोनार्च हॉस्पिटल, स्पॅन हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर केअर हॉस्पिटल, अल फैज चॅरिटेबल हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल. |
एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड (9975587512) | अक्कलकोट | सहायक गटविकास अधिकारी बी.डी. ऐवळे (9767993399) | श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल |
| सांगोला | शाखा अभियंता श्री. देवकर (7875408777) | डॉ. सुनील लवटे हॉस्पिटल |
| करमाळा | सहायक गटविकास अधिकारी राजाराम भोंग (7387686295) | ग्रामीण रूग्णालय, जेऊर. |
| मंगळवेढा | शाखा अभियंता श्री. सुतार | संत दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल. |
| माढा | शाखा अभियंता सचिन हेडगिरे (9881902490) | सन्मती नर्सिंग होम, माढा, साखरे हॉस्पिटल, डॉ. बोबडे हॉस्पिटल, कुर्डूवाडी. |
0 Comments