Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजचे कोवीड हॉस्पिटला मुकूल माधव फाउंडेशनच्या वतीने व्हेंटीलेटर व ऑक्सीमीटरची मदत

अकलूजचे कोवीड हॉस्पिटला मुकूल माधव फाउंडेशनच्या वतीने व्हेंटीलेटर व ऑक्सीमीटरची मदत 


अकलूज दि.२२(क.वृ.): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी उभारलेल्या " अकलूज कोवीड हॉस्पिटल " साठी पुण्याच्या  मुकूल माधव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १२ व्हेंटिलेटर व मुबलक प्रमाणात ऑक्सीमीटरची मदत करण्यात आली . 
माळशिरस तालुक्यासह सोलापूर ,  पुणे व सातारा जिल्ह्यातील  कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , आ रणजितसिंह मोहिते पाटील , शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील , उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे  २ कोटी रुपये खर्च करुन अकलूज कोवीड हॉस्पिटलची निर्मिती केली . या कोवीड हॉस्पिटलला नर्सिंग स्टाफ हे मनुष्यबळ शिवरत्न शिक्षण संस्थेचे  विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज यांनी पुरविले आहे . कोवीड रुग्णांना येथे शासकीय दरात सशुल्क सेवा सुरु करण्यात आली आहे .  १७ ऑगस्ट पासून हे हॉस्पिटल कार्यरत झाले आहे .  या कोवीड हॉस्पिटल मध्ये सध्या १२ कोवीड रुग्ण उपचार घेत आहेत . 
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की , मुकूल माधव फाउंडेशन या ट्रस्टचे  विश्वस्थ रितू छाब्रिया व माझे मित्र प्रकाश छाब्रिया यांनी या कोवीड हॉस्पिटलसाठी मदत केली आहे . या हॉस्पिटलचा उपयोग सोलापूर जिल्ह्यासह पुणे व सातारा जिल्ह्यासाठी होत आहे . या हॉस्पिटलसाठी  शासनाकडेही निधीची मागणी केली आहे .  हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे . जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे  म्हणाले, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नामुळेच येथे अद्यावत कोवीड हॉस्पिटल उभे राहू शकले आहे . ज्यांना शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे नाहीत त्यांच्यासाठी सशुल्क येथे उपचार केले जात असून सध्या १२ रुग्णांवर उपचार चालु आहेत .
Reactions

Post a Comment

0 Comments